आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या चाचणीत प्रशिक्षक पॉझिटिव्ह; आता आणखी दोन चाचण्या होणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्षेत्ररक्षक प्रशिक्षक दिशांत याज्ञिक 14 दिवस रुग्णालयात राहतील
  • चेन्नईच्या पूर्व सत्र शिबिरात जडेजा सहभागी होणार नाही

आयपीएल फ्रँचायझीने खेळाडू व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू केली. बीसीसीआयच्या नियमानुसार यूएईला रवाना होण्यापूर्वी दोन कोरोना चाचण्या करणे आवश्यक आहेत. मात्र, फ्रँचायझी तीन करणार आहेत. राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या चाचणीत क्षेत्ररक्षक प्रशिक्षक दिशांत याज्ञिक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ते गेल्या दहा दिवसांत संघाच्या कोणत्याही सदस्याला भेटले नाहीत. इतर सर्व सदस्य निगेटिव्ह आले. फ्रँचायझीने म्हटले की, दिशांत उदयपूरमध्ये आपल्या घरीच आहेत. त्यांना १४ दिवसांसाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. आता दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना यूएईला जायला मिळेल. तेथे पोहोचल्यानंतर सर्वांना सहा दिवस क्वॉरंटाइनमध्ये राहावे लागेल.

अन-अकॅडमी आयपीएलच्या मुख्य प्रायोजकांच्या शर्यतीत

एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी अन-अकॅडमी आयपीएलच्या मुख्य प्रायोजकांच्या शर्यतीत सहभागी झाली आहे. ते बोली लावणार असून त्याबाबत गंभीर आहेत. व्हिवो बीसीसीआयला एका सत्रासाठी ४४० कोटी देत होता. मंडळाला नव्या प्रायोजकाकडून ३००-३५० कोटी मिळण्याची शक्यता आहे. नव्या मुख्य प्रायोजकांची घोषणा १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...