आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:आता राजीव शुक्ला लवकरच बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी, माहिम वर्मा यांनी दिला राजीनामा

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • बीसीसीआय करणार अधिकृत घाेषणा

एकनाथ पाठक 

आयपीएलचे माजी चेअरमन राजीव शुक्ला आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) सक्रिय हाेण्याचे चित्र आहे. यासाठी त्यांच्याकडे मंडळाच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे येणार आहेत. यासाठीची अधिकृत अशी घाेषणा लवकरच बीसीसीआयकडून केली जाईल. 

नुकतीच माहिम वर्मा यांची उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी निवड झाली. मंडळाच्या घटनेनुसार एका व्यक्तीला लाभाची दाेन पदे भूषवता येत नाहीत. त्यामुळे त्यांनी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे हे पद रिक्त आहे. मंडळाच्या नियमानुसार येत्या ४५ दिवसांत विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या पदावरील नियुक्ती गरजेची आहे. मात्र, सध्या लाॅकडाऊनमुळे ही बैठक लांबणीवर पडण्याचे चित्र आहे.

राज्यसभेची उमेदवारी नाकारली

राजीव शुक्ला यांनी पक्षाच्या वतीने राज्यसभेच्या उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. मात्र, त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावताना उमेदवारी नाकारली. याचदरम्यान त्यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयमध्ये सक्रिय हाेण्याच्या आपल्या हालचालींना वेग आणला. यातूनच आता त्यांनी यासाठीचा आपला दावा मजबूत केला.

आयपीएल विंडोवरचे काम माेठे

आयपीएल न झाल्यास यंदा मंडळाला जवळपास ४ हजार काेटींचा फटका बसणार आहे. त्यामुळे हा धाेका लक्षात घेऊन आता मंडळाचे अधिकारी नव्या आयपीएल विंडाेवर काम करत आहेत. ही स्पर्धा विदेशात आयाेजनावर चर्चा सुरू आहे.