आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयसीसीच्या 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील युवा गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर आता एका वेगळ्याच प्रकरणामुळे अडचणीत सापडला आहे. त्याने वय लपवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्म तारखेत बदल करण्यात आला. त्यानंतर त्याने आपल्या वय 1 वर्ष 10 महिन्यांनी लपवल्याचे समोर आले. याप्रकरणी महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे रितसर लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे आता लवकरच उस्मानाबादच्या राजवर्धनवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
त्याने आपल्या जन्म तारखेच्या दाखल्यात खाडाखोड केल्याचे समोर आले. याप्रकरणी तेरणा हायस्कूलच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर खाडाखोड केलेल्या जन्म तारखेचा उल्लेख करण्यात आला. याबाबत त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणाचा तपास जिल्हा क्रीडा अधिकारी सारिका काळे यांनी केला.
जन्म जानेवारी 2001 चा; दाखवला नोव्हेंबर 2002 मध्ये :
उस्मानाबादच्या युवा वेगवान गोलंदाज राजवर्धन सुहास हंगरगेकरचा जन्म हा 10 जानेवारी 2001 मध्ये झालेला आहे. याची नोंद पहिल्या वर्गात प्रवेश घेताना करण्यात आली आहे. त्यानंतर ही नोंद इयत्ता दुसरी उत्तीर्ण, इयत्ता पाचवी उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर, इयत्ता सहावीत प्रवेश घेतल्याच्या दाखल्यावर, सातवी उत्तीर्ण झाल्यावर शाळा सोडल्यानंतर, आठवी प्रवेश नोंद रजिस्टरवर कायम आहे. मात्र, इयत्ता दहावी उत्तीर्णनंतर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर या जन्म तारखेत खाडाखोड करण्यात आली. त्यामुळे ही जन्म तारीख 10 नोव्हेंबर 2002 अशी करण्यात आली.
अशी होणार कारवाई- पाच वर्षांची बंदी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) वय लपवल्याप्रकरणी पाच वर्षांच्या बंदीची कारवाई करू शकेल. मात्र, अद्याप याबाबत बीसीसीआयने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.
याला बसणार फटका :
इनपूट - एकनाथ पाठक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.