आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Ranji Trophy 2022: India U19 Captain Yash Dhull Hits 100 On Debut, Raj Bawa Strikes With His First Delivery

रणजीमध्येही अंडर-19 च्या हिरोचे वर्चस्व:पदापर्णातच यश धुलने ठोकले शतक; राज बावाने पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट

गुवाहटी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजपासून सुरू झालेल्या रणजी ट्रॉफीच्या साखळी सामन्यात अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंची चमक कायम आहे. वर्ल्डकप टीमच्या कर्णधार यश धुल याने फर्स्ट क्लास सामन्यात पहिले शतक झळकावले. तो 113 धावा करून बाद झाला. त्याचवेळी अंडर-19 विश्वचषकात विजयाचा हिरो ठरलेल्या अष्टपैलू राज अंगद बावाने चंदीगडकडून पदार्पण करताना हैदराबादविरुद्ध पहिल्याच चेंडूवर आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली.

19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार यश धुल याने गुवाहाटी येथे रणजी ट्रॉफीच्या गट एच सामन्यात दिल्लीकडून प्रथम श्रेणी पदार्पण करताना तमिळनाडूविरुद्ध पहिले शतक झळकावले. त्याने 53 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 133 चेंडूत शतक झळकावले.

धुलने ध्रुव शौरीसह दिल्लीसाठी डावाची सुरुवात केली. शॉरी 2.5 षटकांत 7 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 8 चेंडूत केवळ 1 धाव काढली. त्यानंतर धुलला साथ देण्यासाठी आलेला हिम्मत सिंगही एकही धाव न काढता माघारी परतला.

नितीश राणा, जॉन्टी सिद्धू यांच्यासोबत भागीदारी
यशने नितीश राणासोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर धूलनेही जॉन्टी सिद्धूसोबत चांगली भागीदारी केली. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. नितीश राणाला तामिळनाडूचा मीडियम गोलंदाज एम मोहम्मदने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने 21 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 25 धावा केल्या. लंचपर्यंत दिल्लीने 3 गडी गमावून 144 धावा केल्या होत्या. लंचच्यावेळी यश 84 आणि जॉन्टी सिद्धूने 34 धावा केल्या. उपाहारानंतर यशने आपले शतक पूर्ण केले.

यश धुलने 133 चेंडूत शतक झळकावले.
यश धुलने 133 चेंडूत शतक झळकावले.

बावाने पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट
दुसरीकडे, भुवनेश्वर येथे खेळल्या जात असलेल्या एलिट गट-2 च्या सामन्यात चंदीगडकडून खेळत असलेल्या विश्वचषकाचा नायक राज अंगद बावाने आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हैदराबादच्या तन्मय अग्रवालला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हैदराबादने 2 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा केल्या.

IPL ऑक्शनमध्ये बावा 2 कोटींमध्ये विकला

आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्सने यश धुलला 50 लाखांना विकत घेतले, तर राज अंगद बावाला पंजाब किंग्जने 2 कोटींना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 20 लाख होती.

बातम्या आणखी आहेत...