आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांचा धमाकेदार डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 83 चित्रपटाच्या प्रीमियरच्या नाईटचा आहे, ज्यामध्ये दोघेही जबरदस्त डान्स करत आहेत. दोघेही 'हम बने तुम बने एक दुजे' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये 1983 च्या विश्वचषकाचा नायक बलविंदर सिंग संधू देखील आहे.
या पार्टीचा व्हिडिओ शेअर करताना रवी शास्त्रींनी लिहिले की, '2022 मध्ये जाणे खूप आनंददायी आहे. मला अप्रतिम नृत्य शिकवल्याबद्दल रणवीर सिंगचे आभार. 2022 हे वर्ष तुम्हा सर्वांसाठी उत्तम, आरोग्यदायी आणि प्रेरणादायी जावो.
रणवीर सिंगचा 83 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित
रणवीर सिंगचा 83 हा चित्रपट नुकताचं चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 1983 च्या वर्ल्डकपवर आधारित आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 72 कोटींची कमाई केली आहे. शास्त्री यांनी नुकतेच टीम इंडियाचे कोचिंग सोडले आहे. त्यांच्या जागी राहुल द्रविडला टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. शास्त्री यांना 2017 मध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. त्याआधी 2014 ते 2015 विश्वचषकापर्यंत ते संघाचे संचालक होते.
अलीकडेच शास्त्रींकडून धोनीचे जोरदार कौतुक
अलीकडेच शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हटले होते की, 'धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. धोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला की मला संघाशी काहीतरी बोलायचे आहे. शेवटच्या दिवशी शानदार फलंदाजी करून सामना अनिर्णित राखण्यात संघ यशस्वी झाला आहे, असे मला वाटले होते, त्यामुळे तो या सामन्याशी संबंधित काहीतरी बोलेल, पण त्याने निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच चकित केले. यानंतर ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंच्या चेहरा उतरला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.