आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जडेजाच्या चाहत्यांसाठी गुड न्युज:अष्टपैलू रवींद्र जडेजा लवकरच पुनरागमन करणार! फोटो ट्विट करत चाहत्यांना दिले वापसीचे संकेत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जडेजाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. टीम इंडियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने मैदानात वापसी करणार असल्याचे मोठे संकेत दिले आहेत. जडेजाने त्याच्या इशाऱ्याने सांगितले आहे की, तो लवकरच भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजाने आपला एक फोटो शेअर करून चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे आणि त्याच्या पुनरागमनाबद्दल सांगीतले आहे.

गेले काही महिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. दुखापतीमुळे T-20 विश्वचषकापूर्वीच त्याला संघातून वगळण्यात आले होते आणि तेव्हापासून तो तंदुरुस्तीसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनरागमन करण्यासाठी जडेजा सध्या घाम गाळत आहे.

रवींद्र जडेजाने ट्विट करून मैदानात परतण्याचे दिले संकेत

आता मात्र जडेजाने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. त्याने ट्विटरवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि लवकरच भेटू असे म्हटले आहे.

रवींद्र जडेजाच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी त्याचे स्वागत केले असून त्याने लवकरात लवकर भारतीय संघात परतावे, असे म्हटले आहे. त्याचबरोबर जडेजाने आधी रणजी ट्रॉफीमध्ये खेळावे आणि त्यानंतरच भारतीय संघात परतावे, असे काही चाहत्यांचे मत आहे.

तर याशिवाय अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे की अक्षर पटेल सध्या फिरकी अष्टपैलू म्हणून चांगली कामगिरी करत आहे आणि यासाठी जडेजाला आधी स्वतःला सिद्ध करावे लागेल.

जडेजा CSK कडूनच खेळणार

जडेजा IPL 2023 मध्ये CSK कडून खेळताना दिसेल
जडेजा IPL 2023 मध्ये CSK कडून खेळताना दिसेल

रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 साठी रिटेन केले आहे. IPL 2023 मध्ये तो फक्त CSK कडून खेळताना दिसणार आहे आणि त्यामुळे त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. IPL च्या लिलावानंतर चाहते CSK संघावर खूप खूश दिसत आहेत. आता जडेजा किती दिवसात पुनरागमन करतो हे पाहण उत्सुक्याचे ठरेल.

बातम्या आणखी आहेत...