आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवींद्र जडेजा आशिया कपमधून बाहेर:गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून घेतली माघार, अक्षर पटेलला संधी

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया कपच्या सुपर-4 सामन्यांपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलला टीममध्ये घेेण्यात आले आहे. जडेजा पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्धच्या टीममध्ये होता. त्याचवेळी अक्षर पटेल हा राखीव खेळाडू म्हणून UAEला गेला होता.

आशिया चषकात जडेजाची कामगिरी

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जडेजाने 29 चेंडूंत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 35 धावांची शानदार खेळी खेळली होती. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने दोन षटकांत केवळ 11 धावा दिल्या होत्या्.

तर हाँगकाँगविरुद्धच्या दुसऱ्या साखळी सामन्यात जडेजाने घातक गोलंदाजी करत चार षटकांत केवळ 15 धावा देत विकेटही घेतली. तसेच फ्री हिटवर शानदार थ्रो करून रनआउटही केले.

अक्षर पटेलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

रवींद्र जडेजाच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या अक्षर पटेलकडून आता भारतीय चाहत्यांना चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असेल. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अक्षरने नाबाद 64 धावांची खेळी केली. त्याच्या फलंदाजीमुळेच संघाला विजय मिळाला होता. त्या सामन्यात भारतासमोर 311 धावांचे लक्ष्य होते आणि 80 धावांच्या आतच टीम इंडियाच्या 3 विकेट पडल्या होत्या, पण श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या शानदार फलंदाजीने भारताला विजय मिळवून दिला.

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार अर्शदीप सिंग, आवेश खान, आर. अश्विन, युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई.

बातम्या आणखी आहेत...