आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत vs इंग्लंड:200 धावांचा टप्पा गाठला, पहिल्या कसोटीत 578 धावांची खेळी केल्यानंतर इंग्लंडने 178, 134, 164, 112, 81 धावा केल्या

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या डावात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि शुभमन गिल खाते न उघडताच अँडरसनच्या तिसऱ्या चेंडूवर बाद झाला.

भारताविरुद्ध अखेरच्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंड २०० धावा काढण्यात यशस्वी ठरला. मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात ५७८ धावा काढल्यानंतर पुढील ५ डावांत संघाने १७८, १३४, १६४, ११२ आणि ८१ धावा केल्या होत्या. केवळ रुटने त्या डावात २१८ धावा काढल्या होत्या. संघ अद्याप ती धावसंख्या गाठू शकला नाही.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली आणि सलामी फलंदाज क्राउली-सिब्ले दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा काढल्या. अंतिम अकरामध्ये परतलेल्या डॅनियल लॉरेन्सने ४६ धावा केल्या. एकाही ५० धावांची भागीदारी केली नाही. ७६ व्या षटकांत इंग्लंडचा डाव २०५ धावांवर संपुष्टात आला. अक्षरने ४ व अश्विनने ३ बळी घेतले.

पहिल्या डावात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि शुभमन गिल खाते न उघडताच अँडरसनच्या तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजाराने संघाची पडझड हाेऊ दिली नाही. दिवसअखेर भारताने १ बाद २४ धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंडकडे ११८ धावांची आघाडी आहे.

इंग्लिश संघातील खेळाडूंनी आपली मानसिकता बदलण्याची गरज
इंग्लंड आता दावा करू शकत नाही की, चौथ्या कसोटीतील खेळपट्टीमुळे त्यांचा संघ २०५ धावांवर ढेपाळाला. त्यांची अडचण मानसिक आहे. ते विचार करतात की, संपूर्ण क्रिकेट जगत त्यांच्याविरुद्ध आहे. फलंदाजी मजबूत करण्यासाठी ते तीन गोलंदाजांसह उतरले. स्टोक्स व रुटकडून ते योगदानाची अपेक्षा करत आहेत, ज्यामुळे त्यांच्यावर दबाव येईल. आतापर्यंत स्टोक्सने फलंदाजीत चांगली कामगिरी केली. खेळपट्टी सामान्य कसोटी खेळपट्टीप्रमाणे आहे. कुणी अशा खराब फलंदाजीची अपेक्षा केली नव्हती. अक्षर व अश्विन उच्च दर्जाचे फिरकीपटू आहेत. मात्र, पहिल्या दिवशी मिळालेल्या बळींमुळे तेदेखील आर्श्चयचकित झाले असतील. अक्षरने पुन्हा एकदा सकारात्मक विचार करून गाेलंदाजी केली. त्याचबरोबर, सिराजने १४६ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत बेअरस्टोला बाद करत भारतीय चाहत्यांची मने जिंकली. इंग्लंडसाठी युवा खेळाडूंचीदेखील अडचण आहे. ते २०-३० धावांनंतर त्याला मोठ्या धावसंख्येत परावर्तित करू शकत नाहीत असे वाटते. इंग्लंड संघ दिग्गज खेळाडूंवर अवलंबून आहे.

बातम्या आणखी आहेत...