आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या पराभवाची कारणे:श्रेयसने सोडली कॅच, डुस्सेनने केल्या 75 धावा; 9व्या षटकानंतर गोलंदाज विकेट घेऊ शकले नाहीत

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी आफ्रिका संघाने टीम टीम इंडियाच्या टी-20 मध्ये सलग 13व्या विजयाच्या माेहिमेला राेखले. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर 7 गडी राखून मात केली. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 बाद 211 धावा केल्या होत्या. इशान किशनने सर्वाधिक 76 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 19.1 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना का करावा लागला ते जाणून घेऊ...

गोलंदाजांचा फ्लॉप शो, पंतची खराब कॅप्टन्सी

या सामन्यात भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे गोलंदाजांचा फ्लॉप शो. अनुभवी भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 43 धावा दिल्या. त्याचवेळी आवेश खानने 4 षटकात 35 धावा दिल्या. हर्षल पटेलही चांगलाच महागात पडला आणि त्यानेही 4 षटकांत 43 धावा दिल्या. प्रथमच कर्णधारपद भूषवणारा ऋषभ पंतही छाप पाडू शकला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने लेगस्पिनर युझवेंद्र चहलला फक्त २.१ षटकेच दिली. यासोबतच सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजीत सातत्याने बदल करत राहिल्याने त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्याचवेळी त्याने मिलरचा चुकीचा डीआरएसही घेतला.

श्रेयस अय्यरने सोडली कॅच

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा हा सलग सहावा पराभव आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला सलग दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डावात श्रेयस अय्यरने डुस्सेनचा सोपा झेल सोडला. इथेच संपूर्ण सामना बदलला.

15 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 148 अशी होती, पण 16व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर श्रेयस अय्यरने डुस्सेनचा सोपा झेल सोडला. त्यावेळी डुस्सेन 30 चेंडूत 29 धावांवर खेळत होता. यानंतर खेळ पूर्णपणे बदलला आणि डुस्सेनने सामन्यात 75 धावांची शानदार खेळी केली. मिलरसोबत डुस्सेनने चौथ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली.

तत्पूर्वी, भारताकडून इशान किशनने 48 चेंडूत 76 धावा केल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतच्या बॅटमधून धावा निघाल्या, पण दोन्ही संघांची गोलंदाजी या सामन्यात फ्लॉप ठरली. सामन्यानंतर पंत म्हणाला की, आमच्याकडे बोर्डावर पुरेशा धावा होत्या, पण मला वाटते की आम्ही दुसऱ्या डावात चांगले नव्हतो. कधी कधी विरोधी संघालाही श्रेय द्यायला हवे. मिलर आणि डुस्सेन यांनी शानदार फलंदाजी केली.

बातम्या आणखी आहेत...