आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅमनवेल्थ:जायबंदी नीरजची माघार; महासंघासमाेर नव्या ध्वजवाहकाचा पेच

बर्मिंगहॅम24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅ - Divya Marathi
अ‍ॅ

उद्या गुरुवारपासून काॅमनवेल्थ गेम्सला सुरुवात हाेणार आहे. या स्पर्धेच्या दाेन दिवसआधीच भारतीय संघाला धक्का देणारी घटना घडली. टाेकियाे ऑलिम्पिक चॅम्पियन व वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील राैप्य विजेत्या भालाफेकपटू नीरज चाेप्राने या स्पर्धेतून माघार घेतली. मांडीच्या गंभीर दुखापतीमुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्याने मंगळवारी जाहीर केले.

काॅमनवेल्थमध्ये अ‍ॅथलेटिक्स गटात सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या नीरजच्या अनुपस्थितीचा फटका भारतीय संघाला बसणार आहे. त्याने माघार घेतल्यामुळे आता भारतीय ऑलिम्पिक महासंघासमाेर काॅमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन साेहळ्यादरम्यान ध्वजवाहकाचा माेठा पेच निर्माण झाला. कारण, नीरजची परेडदरम्यान ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली हाेती. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघालाही माेठा धक्का बसला आहे. टीममधील दाेघी काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे समाेर आले.

बातम्या आणखी आहेत...