आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:303 दिवसांनंतर देशांतर्गत क्रिकेटचे पुनरागमन, सर्वप्रथम टी-२० स्पर्धा, फेब्रुवारीत आयपीएल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयदेवच्या नेतृत्वात साैराष्ट्र संघाचे खेळाडू भाेजनाचा अानंद लुटताना. - Divya Marathi
जयदेवच्या नेतृत्वात साैराष्ट्र संघाचे खेळाडू भाेजनाचा अानंद लुटताना.
  • क्रिकेट टी-20 च्या फाॅरमॅटने भारतामध्ये क्रिकेट स्पर्धेची हाेणार दमदार सुरुवात; युवांना चमकण्याची संधी
  • अाजपासून सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी टी-२० स्पर्धेला हाेणार सुरुवात

काेराेना महामारीच्या जीवघेण्या संकटामुळे यंदा क्रीडा विश्वाला माेठा धक्का बसला. मात्र, याच संकटातून सावरत अाता क्रीडा विश्व वेगाने पुर्वपदावर अाले अाहे. यातूनच जागतिक पातळीवर स्पर्धा अायाेजनाला सुरुवात झाली. यातून भारतामध्येही देशांतर्ग स्पर्धेच्या अायाेजनाला सुरुवात करण्यात अाली. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुढाकार घेतला. यातून देशांतर्गत टी-२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला रविवारी सुरुवात होत आहे. गतवर्षी ९ ते १३ मार्चदरम्यान झालेल्या रणजीच्या अंतिम सामन्यानंतर बीसीसीआयने पहिली घरची स्पर्धा आयोजित केली. म्हणजे ३०३ दिवसांनी देशांतर्गत स्पर्धेला पुन्हा सुरुवात होत आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या आयपीएल लिलावपूर्वी या स्पर्धेच्या माध्यमातून फ्रँचायझींना नव्या गुणवत्तेचा शोध घेता येईल. त्यामुळे रणजी व विजय हजारे करंडक पूर्वी या टी-२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

सूर्यकुमार यादव, ईशान किशनला दावेदारीची संधी :
सूर्यकुमार मधल्या फळीतील फलंदाज आणि इशान किशन यष्टिरक्षक फलंदाज म्हणून आपली दावेदारी मजबूत करू इच्छितात. यातून या दाेघांना यंदाच्या सत्रातील दाैऱ्यासाठी अाणि मालिकांसाठी संधी मिळू शकेल. पुढे फेब्रुवारी-मार्च मधील इंग्लंड विरुद्ध मालिका व या वर्षी होणाऱ्या आशिया कप व विश्वचषकावर त्यांची नजर आहे.

२२ दिवसांत १६९ सामने
१० ते ३१ जानेवारीदरम्यान ७ ठिकाणी ही स्पर्धा पार पडेल. ३८ संघांत १६९ सामने खेळवले जातील. १९ जानेवारीपर्यंत साखळी सामने रंगतील. २६ जानेवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये बाद फेरीला सुरुवात होईल. या स्पर्धेच्या दरम्यान प्रेक्षकांच्या स्टेडियममधील प्रवेशावर बंदी आहे. इंदूर, मुंबई, अहमदाबाद, एलूर, कोलकाता, बडोदा आणि चेन्नई येथे सामने हाेतील.

आयपीएल फ्रँचायझींची युवा खेळाडूंवर बारीक नजर
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी युवा खेळाडूंना आयपीएल संघाचे तिकीट मिळवून देऊ शकते. मुंबईचा शम्स मुलानी, बंगालचा अभिमन्यू ईश्वरन, सौराष्ट्रचा धर्मेंद्र सिंग जडेजा, बडोद्याच्या लुकमान मेरीवाला सारख्या खेळाडूंवर फ्रँचायझींचे लक्ष असेल. यापूर्वी युसूफ पठाण, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या सारख्या मोठ्या खेळाडूंना आयपीएलमुळे ओळख मिळाली.

वेगवान गाेलंदाज श्रीसंत सात वर्षांनंतर करणार कमबॅक
मँच फिक्सिंगची बंदी पूर्ण करून केरळचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत या स्पर्धेद्वारे क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. त्याचबरोबर शिखर धवन, संजू सॅमसन, यजुवेंद्र चहल, सुरेश रैना, भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या सारखे खेळाडू स्पर्धेचा भाग असतील. हार्दिक पांड्या, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर व मनीष सहभागी होणार नाहीत.

कर्णधार कृणालची शिविगाळ; उपकर्णधार हुडाची स्पर्धेतून माघार
बडाेदा संघाच्या उपकर्णधार दीपक हुडाने स्पर्धेच्या पुर्वसंध्येलाच माघार घेतली. कर्णधार कृणाल पांड्याने शिविगाळ केल्याने त्याने हा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...