आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिकी पाँटिंग समालोचन बॉक्समध्ये परतला,:तब्येत बिघडल्याने अनेक लोक घाबरले..त्यांच्यासोबत मीही घाबरलो होतो, सांगितली आपबीती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला (शुक्रवारी) 3 डिसेंबरला छातीत दुखत असल्याची तक्रार होती. त्यामुळे त्याला मोठी खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल केले. यावेळी रिकी पाँटिंगसोबत त्याचा माजी सहकारी जस्टिन लँगरही होता.

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात तो उर्वरित दिवसाच्या मॅचसाठी समालोचन करण्यासाठी परतला नव्हता, परंतु नंतर असे सांगण्यात आले की त्याची तबीयत बिघडल्यामुळे पर्थच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे आज कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी तो पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये परतला आणि त्याच्यासोबत घडलेली आपबीती सांगीतली .

7 क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत रिकी पॉन्टिंगने गेल्या 24 तासांमध्ये घडलेला किस्सा सांगितला आणि म्हणाला, 'माझी अचानक तब्येत बिघडल्यामुळे अनेक लोक घाबरले होते आणि त्यांच्यासोबत मीही घाबरलो होतो.

मी कॉमेंट्री बॉक्समध्ये होतो आणि त्यावेळी माझ्या छातीत दुखू लागले तेव्हा मी माझी छाती थोडी ताणली पण कॉमेंट्री करताना मला जाणवले की माझा त्रास वाढला आहे त्यामुळे या बद्दल मी माझ्यासोबत असलेल्या खेळाडूला आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेल्या जस्टिन लँगरला सांगितले.

त्यानंतर आम्ही लगेचच हॉस्पिटलला निघालो. रुग्णालयात पोहोचल्यानंतर मला आवश्यक असलेले सर्व चांगले उपचार मिळाले आणि मी आता चांगला स्वस्थ आहे

-

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून दोन वनडे विश्वचषक जिंकणारा रिकी पाँटिंग पुढे म्हणाला, 'मला आता सकाळी खूप बरे वाटत आहे.' रिकी पाँटिंगनंतर जस्टिन लँगरनेही या विषयावर चर्चा केली आणि म्हणाला,

'त्यावेळी रिकी पॉन्टिंग माझ्याकडे आला आणि म्हणाला की त्याला बरे वाटत नाही, तर त्यात नक्कीच काळजी करण्यासारखे आणि त्याला लगेच उपचारासाठी घेऊन जाण्यासारखीच बाब होती.

कारण गेल्या 12 महिन्यांत माजी खेळाडूंसोबत हा प्रकार घडला आहे, ज्यामध्ये रॉड मार्श, शेन वॉर्न यांची नावे आहेत, त्यामुळे आम्हाला ते गांभीर्याने घ्यावे लागले. रिकी पाँटिंगने ट्विट करतानाही आपल्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...