आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारुरकीमध्ये ज्या ठिकाणी क्रिकेटर ऋषभ पंतचा अपघात झाला होता. त्याठिकाणी NHAI च्या पथकाने पाहणी केल्यानंतर तो खड्डा भरण्यात आला आहे. याशिवाय ब्लॅक स्पॉट असलेल्या आणि मातीच्या ढिगाऱ्यांभोवती रेडियमचे फलकही लावण्यात आले आहेत. जेणेकरून रात्रीच्या वेळी दुरूनच ब्लॅक स्पॉट पाहता येईल.
ऋषभचा 30 डिसेंबरला सकाळी रुरकी येथील गुरुकुल नरसन येथे NH-58 वर अपघात झाला. रस्त्यावरील खड्डे आणि मातीचा ढिगारा हे त्या अपघाताचे कारण होते.
ऋषभ पंत मर्सिडीजमधून दिल्लीहून रुरकीला येत होता
30 डिसेंबर रोजी पहाटे 5.15 च्या सुमारास क्रिकेटपटू ऋषभ पंत त्याच्या रुरकी येथील घरी येत होता. घरापूर्वी सुमारे 10 किलोमीटर अंतरावर गुरुकुल नरसन चौकीसमोर ब्लॅक स्पॉट असल्याने त्यांचा अपघात झाला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृतीत सुधारणा आहे.
मर्सिडीज 5 फूट उंच उडाली होती
गाडी ताशी दीडशे किलोमीटर वेगाने धावत होती. ऋषभला अंधारात खड्डा दिसला नव्हता आणि गाडी खड्ड्यात पडल्याने तो असंतुलित झाला. कार 200 मीटरपर्यंत घसरली आणि दुभाजकाला धडकली. त्यानंतर सुमारे 5 फूट उडाली आणि दुसऱ्या रस्त्यावर पोहोचली. मर्सिडीज तिथून 50 मीटर अंतरापर्यंत खेचत राहिली. त्यानंतर खांबाला धडकल्यानंतर कारने पेट घेतला. पण गाडी पेट घेण्याच्या आधीच ऋषभ गाडीतून बाहेर पडला.
ऋषभच्या अपघातानंतर प्रशासनाला आली जाग
या ठिकाणी एका महिन्यात 7 ते 8 अपघात होतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. इतके अपघात होऊनही प्रशासनाकडून त्याची दुरुस्ती केली नाही. ऋषभचा अपघात झाला तेव्हा प्रशासन सतर्क झाले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला राजधानी डेहराडून ते दिल्लीच्या टीमने घटनास्थळाची पाहणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.