आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत ऋषभ पंतच्या गुडघ्याच्या लिगामेंटवर शस्त्रक्रिया:कोकिलाबेन रुग्णालयात 3 तास चालले ऑपरेशन, 3-4 दिवस निरीक्षणाखाली राहणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
पंतला बुधवारी डेहराडूनहून मुंबईला एअरलिफ्ट करण्यात आले. - Divya Marathi
पंतला बुधवारी डेहराडूनहून मुंबईला एअरलिफ्ट करण्यात आले.
  • :

कार अपघातात जखमी झालेला भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतवर आता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथून पंतबद्दल एक मोठे अपडेट येत आहे. ऋषभ पंतवर शस्त्रक्रिया झाली आहे. या ऑपरेशननंतर स्टार विकेटकीपर फलंदाज पंतकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पंतच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उजव्या पायाच्या गुडघ्यावरील लिगामेंटवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल ऋषभ पंतची ही शस्त्रक्रिया शुक्रवारी झाली. हे ऑपरेशन डॉ.दिनशॉ पादरीवाला यांनी केले. या शस्त्रक्रियेनंतर आता ऋषभ पंतला जवळपास 3 ते 4 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

ऋषभ पंतचे हे ऑपरेशन जवळपास चालले 3 तास ​​

उपचारानंतर ऋषभ पंतला बरे वाटत असून त्याचा प्रतिसादही चांगला आहे. कार अपघातानंतर ऋषभ पंतच्या डोक्याला, पाठीला, पायाला, गुडघाला आणि घोट्याला गंभीर दुखापत झाली होती. यापूर्वी त्याच्यावर डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पंतला एअरलिफ्ट करून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवले.

रुरकीजवळ पंतचा झाला होता कार अपघात

ऋषभ पंतला दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियामध्ये निवडण्यात आले नव्हते. BCCI ने ऋषभ पंतला पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) जाण्यास सांगितले होते.

मात्र त्याआधी तो दुबईला ख्रिसमस साजरा करण्यासाठी गेला होता. येथे त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत ख्रिसमस साजरा केला.

यानंतर ऋषभ पंत आपल्या देशात परतला आणि दिल्लीहून आपल्या गावी रुरकीला त्याच्या कारने जात होता. दरम्यान, 30 डिसेंबरच्या पहाटे ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला.

रुरकीजवळील गुरुकुल नरसन परिसरात सकाळी जवळपास साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता आणि स्वतः गाडी चालवत होता. पंतने सांगितले रस्त्यावरील खड्यामुळे हा अपघात झाला होता. गाडीने पलटी खाल्यानंतर पंतने विंडो स्क्रीन तोडून बाहेर आला. यानंतर गाडीला भीषण आग लागली.

बातम्या आणखी आहेत...