आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची नजर पहिल्या विजयावर:गाेलंदाजांच्या सुमार कामगिरीचे ऋषभसमोर आव्हान, भारत-आफ्रिका आज दुसरा टी-20 सामना

कटक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार ऋषभ पंतसाठी आता टीम इंडियाला विजयी ट्रॅकवर आणण्यासाठी सुमार गोलंदाजी अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे त्याला संघात काही मोठे बदल करावे लागणार आहेत. यासाठी युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी संधी मिळण्याचे चित्र आहे.

यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी कटकच्या मैदानावर मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. विजयी सलामी देत पाहुण्या आफ्रिका संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता टीम इंडिया आपल्या दुबळ्या बाजू अधिक सक्षम करत विजयी ट्रॅकवर येण्यासाठी उत्सुक आहे. याच विजयासाठी वेगवान गोलंदाजाला दमदार पुनरागमनाची संधी दिली जाण्याचे चित्र आहे. सलामी सामन्यात भारताच्या आवेश खान वगळता इतर गोलंदाजांनी १० पेक्षा अधिक इकॉनॉमीने धावा दिल्या. आता ऋषभ पंत नव्या डावपेचांसह मैदानावर उतरणार आहे. यादरम्यान आता संघाच्या विजयावर ऋषभ पंतच्या नेतृत्वाची परीक्षा आहे.

कर्णधार ऋषभच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
कर्णधार ऋषभ पंतचे नेतृत्व मालिकेतील सलामी सामन्यातच अपयशी ठरले. त्याचे काही निर्णय संघाला चांगलेच महागात पडले. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्याने सलामी सामन्यात यंदाच्या आयपीएलमधील पर्पल कॅप होल्डर चहललाफक्त दोनच षटके गोलंदाजीची संधी दिली. याशिवाय इतरांना दिलेली संधी संघाच्या अंगलट आली. आवेश वगळता इतर गोलंदाजांनी मोठ्या प्रमाणात धावा दिल्या.

वेगवान गोलंदाजीचे श्रेयससमोर आव्हान टीम इंडियाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर हा वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यासमोर अपयशी ठरत आहे. त्यामुळे आता त्याला यासाठी आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची गरज आहे, असा सल्ला माजी सलामीवीर वसीम जाफरने श्रेयसला दिला. श्रेयसला गत सामन्यात आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज प्रिटोरियसने बाद केले होते. ‘श्रेयसला वेगवान गोलंदाजांच्या चेंडूंचा यशस्वीपणे सामना करता येत नाही. तो यादरम्यान फटका मारण्याच्या प्रयत्नात जागेवर गिरकी घेतो, असेही जाफरने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...