आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Road Safety Series, Lack Of Coordination Among Organizers, Lax Safety Of Sri Lankan Players, New Teams Joining The Series Without Any Schedule

'रोड सेफ्टी सिरीज'-आयोजकांमध्ये समन्वयाचा अभाव:श्रीलंकन खेळाडूंच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, सिरीजमध्ये शेड्युलविना नवीन संघ

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ग्रीन पार्कमध्ये शनिवारपासून सुरू होणाऱ्या रोड सेफ्टी सिरीज टूर्नामेंट निष्काळजीपणामुळेच जास्त चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. सिरीजच्या आयोजकांकडून अचानक नव्या सत्राची यादी पुन्हा पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये बांग्लादेशच्या टीमचा नव्याने समावेश करण्यात आला होता . यानंतर बांग्लादेशचे काही खेळाडू दुपारी सरावासाठी मैदानावर पोहोचली होती, ते फक्त 45 मिनिटांमध्ये हॉटेलसाठी सराव न करता रवाना झाले.

शहरात होणाऱ्या सामन्यांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी सदोष व्यवस्थापनामुळे समोर येत आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत होणाऱ्या नेटच्या सरावातही खंड पडला आहे. यावेळी श्रीलंकेच्या टीमला सराव करायचा होता. मात्र 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त हवामान असल्यामुळे सराव संध्याकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आला.

संध्याकाळी श्रीलंकेची टीम परवानगीशिवाय ग्रीन-पार्कमध्ये पोहोचली

आयोजक कंपनीने शुक्रवारी शहरात होणाऱ्या सामन्यांच्या सराव सत्रात जाहीर केलेल्या वेळापत्रकात श्रीलंकेच्या टीमचा उल्लेख नव्हता, तरीही श्रीलंकेची टीम सायंकाळी 7 वाजता हॉटेलमधून ग्रीन पार्कसाठी रवाना झाली.

यावळी ग्रीनपार्कवर दक्षिण आफ्रिका आणि भारताचे संघ मैदानात सराव करत होते. दरम्यान श्रीलंकेची टीमची बस ही गणेश विसर्जन सोहळ्यात वाहतूक कोंडीमध्ये अडकली.

श्रीलंकेच्या खेळाडूंच्या सुरक्षेत हलगर्जीपणा

हॉटेलपासून स्टेडियमपर्यंत पोलिसांकडून दोन एस्कॉर्ट वाहने दिल्याची चर्चा होती, मात्र व्हीआयपी रोड जाम झाल्यानंतर एकही पोलिस एस्कॉर्ट दिसला नाही.

सिरीजच्या आयोजकांनी उचलला नाही फोन

सिरीजच्या पहिल्या सामन्यापासून दिसून आलेला हलगर्जीपणा पाहून सिरीजचे आयोजक अनस बकाई यांना याबद्दल विचारणा करण्यासाठी फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही. तसेच, संपूर्ण सिरिजचे मीडिया व्यवस्थापन पाहणाऱ्या अजित बेझबरुआ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तीनदा फोन कट केला

योग्य समन्वयाच्या अभाव

मिळालेल्या माहितीनुसार, सिरीजचे आयोजक, संघ व्यवस्थापन आणि ग्राउंड मॅनेजर यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे त्याची भरपाई मात्र येथे येणाऱ्या टीमला चुकवावे लागत आहे. ग्रीन-पार्कच्या एका सूत्राने सांगितले की, या ठिकाणी सामना होत आहे, परंतु आयोजकांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे हा सर्व गोंधळ समोर येत आहे.

श्रीलंकेच्या टीमला सकाळच्या सत्रात सराव करण्यासाठी वेळ मागीतला होता मात्र खराब हवामानामुळे त्यांनी आपला निर्णय बदलला.

बातम्या आणखी आहेत...