आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी सामना:राॅबिन्सन-अँडरसनचे 8 बळी; पाक पराभूत

रावळपिंडी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर आेली राॅबिन्सन (४/५०) आणि जेम्स अँडरसनने (४/३६) शानदार गाेलंदाजीतून इंग्लंड संघाला साेमवारी यजमान पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून दिला. बेन स्टाेक्सच्या नेतृत्वाखाली पाहुण्या इंग्लंड संघाने ७४ धावांनी सलामीचा कसाेटी सामना जिंकला. खडतर ३४३ धावांचा पाठलाग करताना यजमान पाकिस्तान संघाला घरच्या मैदानावर २६८ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. संघाकडून साैद शकीलने सर्वाधिक ७६, सलामीवीर इमामने ४८, माे. रिझवानने ४६ आणि अझहर अलीने ४० धावांची खेळी केली. मात्र, सलामीवीर शफिक (६), कर्णधार बाबर आझम (४), नसीम शाह (६) आणि झाहिद (१) मैदानावर फार काळ आव्हान कायम ठेवू शकले नाहीत. इंग्लंड संघाकडून राॅबिन्सन आणि अँडरसनने प्रत्येकी ४, कर्णधार स्टाेक्स आणि जॅक लीचने प्रत्येकी १ बळी घेतला. विजयी सलामी देत इंग्लंड संघाने दाैऱ्यावरील तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरी आणि यजमान पाकिस्तानसाठी निर्णायक असलेली कसाेटी गुरुवारपासून मुलतानच्या मैदानावर रंगणार आहे. रावळपिंडी कसाेटीत १७६८ धावा, ३७ बळी : यजमान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सलामीची रावळपिंडी कसाेटी लक्षवेधी ठरली. या कसाेटीत १७६८ धावा आणि ३७ बळींची नाेंद झाली. यासह ही कसाेटीच्या इतिहासातील तिसरी कसाेटी ठरली. इंग्लंड संघाने पहिल्या डावात ६५७ व दुसऱ्या डावात ७ बाद २६४ धावा काढल्या.

बातम्या आणखी आहेत...