आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Rohit Sharma And Other 5 Cricketers Spotted Eating At Melbourne Restaurant, Probe Into Alleged Violations

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियाबाबत मोठा वाद:टेस्ट मॅचच्या 6 दिवस आधी रोहितसह 5 खेळाडूंवर प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप, संघापासून केले वेगळे

मेलबर्न4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेलबर्नच्ये रेस्तराँमध्ये जेवताना दिसले क्रिकेटपटू, कोविड प्रोटोकॉल तोडल्याच्या आरोपाची चौकशी सुरू

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्ट आधीच भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात. पाच भारतीय खेळाडूंनी मेलबर्नच्या एका रेस्तराँमध्ये जेवण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना आयसोलेट केले आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि पृथ्वी शॉ अशी या खेळाडूंची नावे आहेत. या खेळाडूंनी कोविड प्रोटोकॉल तोडण्याच्या आरोपाचीही चौकशी केली जात असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) म्हटले आहे.

BCCIने यापूर्वी याप्रकरणी कुठल्याही तपासणीस नकार दिला होता. मात्र नंतर CA कडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, पाच खेळाडूंना आयसोलेट केल्यानंतर या प्रकरणाची संयुक्तपणे चौकशी केली जात आहे. CA म्हटले की, "BCCI आणि CA सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओनंतर सतर्क झाले आहेत. व्हिडिओत रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी न्यू ईयरच्या निमित्ताने मेलबर्नमधील इनडोअर रेस्तराँमध्ये जेवताना दिसत आहेत."

तिसर्‍या टेस्टवर या घटनेचा कसा परिणाम होईल?

BCCI आणि CA च्या चौकशीत कोविड प्रोटोकॉल तोडल्यास पाचही खेळाडूंवर कारवाई केली जाऊ शकते. कोरोना गाइडलाइननुसार, 14 दिवसांचे आयसोलेशन असते. अशा वेळी या खेळाडूंना आयसोलेट केले तर ते तिसर्‍या कसोटीत खेळू शकणार नाहीत. त्याचबरोबर चौथ्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याबद्दलही शंका निर्माण होईल. तसेच एखाद्या खेळाडूला संसर्ग झाल्यावर, त्यांच्या संपर्कात येणार्‍या खेळाडूंचा निर्णय कोविड प्रोटोकॉल अंतर्गत घेण्यात येईल.

प्रोटोकॉल अंतर्गत खेळाडूंना केले आयसोलेट

बायो सिक्यूरिटी प्रोटोकॉल नुसार, सामाजिक अंतर कायम राहावे यासाठी खेळाडूंना केवळ आउटडोर सिटिंगमध्ये बसून जेवण करण्याची परवानगी आहे. CA ने म्हटले की, खेळाडूंनी प्रोटोकॉल तोडला आहे की नाही याचा निर्णय बीसीसीआय आणि आमच्या संयुक्त तपासणीत होईल. भारतीय आणि ऑस्ट्रेलियन मेडिकल टीमच्या सल्ल्यानुसार खेळाडूंना आयसोलेट केले आहे.

CA ने म्हटले की, आयसोलेशन प्रोटोकॉल नुसार प्रशिक्षण आणि प्रवासादरम्यान पाचही खेळाडूंना उर्वरित भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंपासून वेगळे ठेवले जाईल. तथापि या खेळाडूंना प्रोटोकॉलचे पालन करत सराव करण्याची परवानगी राहील.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नवलदीप सिंग नावाच्या क्रिकेट चाहत्याने शुक्रवारी मेलबर्नमधील एका रेस्तराँमध्ये आपल्या आवडत्या भारतीय क्रिकेटपटूंना पाहिले होते. त्याने फक्त त्यांना पाहण्यासाठी जेवणाची ऑर्डर दिली होती. यानंतर त्याने खेळाडूंना न सांगता त्यांचे 118.69 ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे 7000 रुपये) चे बिल देखील दिले. नवलदीप सिंहने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनीचे फोटोज आणि व्हिडिओ देखील शेअर केले होते.

बातम्या आणखी आहेत...