आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय कर्णधार रोहितचा जबरदस्त डान्स:पत्नी रितिकासोबत 'लाल घाघरा' गाण्यावर केला डान्स, मेहुण्याच्या लग्नात केली धूम

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने त्याचा मेहुणा कुणाल सजदेहच्या लग्नात जबरदस्त डान्स केला. गुरुवारी संध्याकाळी रोहित पत्नी रितिका सजदेहसोबत 'गुड न्यूज' चित्रपटातील 'लाल घागरा' गाण्यावर डान्स करताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ शुक्रवारी मोठ्या प्रमाणात सोशल मीडीयावर व्हायरल झाला.

रितिकाने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रोहितसोबतचा एक फोटो शेअर केला.
रितिकाने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रोहितसोबतचा एक फोटो शेअर केला.

मेहुण्याच्या लग्नामुळे पहिला वनडे खेळला नाही

पत्नी रितिकाच्या भावाच्या लग्नामुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेला मुकला आहे. पहिल्या वनडेत रोहितऐवजी संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या कर्णधार आहे. त्याचबरोबर रोहितऐवजी ईशान किशनला संघात संधी मिळाली आहे. रोहित विशाखापट्टणम येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात पुनरागमन करेल आणि संघाचे नेतृत्व करेल.

होळीच्या वेळी बसमध्येही केला डान्स

रोहित शर्माने अहमदाबादमध्ये टीमसोबत बसमध्ये होळी साजरी केली. शुभमन गिलने त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. माजी कर्णधार विराट कोहली गिलच्या मागे नाचताना दिसला तर कर्णधार रोहित शर्मा त्याच्या मागे नाचताना दिसला होता.

श्रेयससोबत केला डान्स

2021 मध्ये रोहितने श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरसोबत 'शहरी बाबू' गाण्यावर डान्स केला होता. यावेळी रोहित शर्माने श्रेयसचे जोरदार कौतुक केले होते. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओसोबत रोहित शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, ' प्रत्येक स्टेप्सची सही मुव्हमेंट, शाबास श्रेयस अय्यर.'

शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यरचा रोहित शर्मासोबतचा डान्स व्हायरल झाला होता
शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यरचा रोहित शर्मासोबतचा डान्स व्हायरल झाला होता
बातम्या आणखी आहेत...