आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा पराभव होऊनही लक्षात राहतील या 5 मोमेंट्स:हार्दिकची षटकारांची हॅटट्रिक, मॅक्सवेलची जबरदस्त फील्डिंग

मोहाली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

T20 क्रिकेटमध्‍ये जगातील प्रथम क्रमांकाचा संघ असलेल्या भारताला तीन सामन्यांच्या T20 सीरीजमधील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 4 गडी राखून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या पराभवाने सर्व दुखावले गेले. चाहते नाराज झाले. पण या सामन्यातील पाच असे काही क्षण होते जे चाहत्यांच्या मनात कायमचे कोरले जातील.

1. केएल राहुलने टीका करणाऱ्यांचे तोंड बंद केले

या सामन्यापूर्वी भारतीय सलामीवीर केएल राहूल त्याच्या संथ फलंदाजीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर होता. संघाच्या आवश्यकतेनुसार त्याचा स्ट्राईक रेट खूपच कमी होत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. हा आरोप देखील तितकाच खरा म्हणावा लागेल. कारण राहूलने यावर्षी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ 122 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. आशिया कपमध्येही त्याची कामगिरी म्हणावी तशी झालीच नाही. पण, ऑस्ट्रेलियाविरूद्ध बदललेल्या शैलीत फलंदाजीला आला. त्याने 35 चेंडूत 55 धावा केल्या. स्ट्राइक रेट 157.14 वर राहिला.

2. रोहित-विराट यांची फ्लॉप कामगिरी राहीली

विराट कोहलीने 7 चेंडूंचा सामना केला आणि त्याने फक्त 2 धावा काढल्या.
विराट कोहलीने 7 चेंडूंचा सामना केला आणि त्याने फक्त 2 धावा काढल्या.

भारतीय संघाचे दोन दिग्गज फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. विराटने आशिया चषक स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. पण या सामन्यात रोहित आणि विराट दोघेही अपयशी ठरले. रोहित 9 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. त्याचवेळी विराटला 7 चेंडूत केवळ 2 धावा करता आल्या. विराट क्रीझवर अजिबात आरामात दिसत नव्हता. तो चेंडूला वेळ देऊ शकला नाही आणि निराशेने खराब शॉट खेळून बाद झाला.

3. मॅक्सवेलची फिल्डिंग शानदार राहीली

मॅक्सवेलने लाँग उडी घेऊन षटकार अडकाविला, तो अविस्मरणीय क्षण.
मॅक्सवेलने लाँग उडी घेऊन षटकार अडकाविला, तो अविस्मरणीय क्षण.

भारतीय डावातील 19 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हर्षल पटेलने नॅथन एलिसच्या चेंडूवर हवाई शॉट खेळला. चेंडूने 6 धावांची सीमा ओलांडली असे दिसते. पण, तसे झालेच नाही. सीमारेषेवर लांबवर ग्लेन मॅक्सवेलचे अविश्वसनीय क्षेत्ररक्षण. त्याचे उडी मारून चेंडू सीमारेषे बाहेरून परत मैदानावर आणला. यादरम्यान, तो स्वतः सीमारेषेच्या बाहेर गेला. पण त्याने षटकार ठोकला. या चेंडूवर फक्त 1 धाव झाली.

4. हार्दिकने शेवटच्या षटकात 21 धावा दिल्या,षटकाराची केली हॅट्ट्रिक

भारतीय संघाला 200 धावांचा पल्ला गाठता आला तर त्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याचा मोठा वाटा होता. त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळताना 30 चेंडूत 71 धावा केल्या. शेवटच्या षटकात त्याने शानदार फलंदाजी केली. या षटकातील पहिल्या चेंडूवर हर्षल पटेलने कॅमेरून ग्रीनकडून एकच चेंडू घेतला. दुसऱ्या चेंडूवर हार्दिकला एकही धाव करता आली नाही. तिसऱ्या चेंडूवर त्याने दोन धावा घेतल्या. यानंतर त्याने लागोपाठ तीन चेंडूत तीन षटकार ठोकले. त्याने चौथा चेंडू मिडविकेटच्या सीमारेषेबाहेर, पाचवा चेंडू लाँग ऑफ बाऊंड्रीबाहेर आणि सहावा चेंडू डीप थर्ड मॅन बाऊंड्रीबाहेर पाठवला.

5. रोहित शर्माने दिनेश कार्तिकचा गळा पकडला

कर्णधार रोहीत शर्माने यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा गळा पकडला, याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला.
कर्णधार रोहीत शर्माने यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा गळा पकडला, याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला.

ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 12व्या षटकात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची मान पकडताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डीआरएसला संमती न दिल्याने रोहित कार्तिकवर नाराजी दर्शवत होता. या षटकात स्टीव्ह स्मिथने पहिल्या दोन चेंडूत एक षटकार आणि एक चौकार मारून 10 धावा केल्या. यानंतर उमेश यादवच्या तिसऱ्या चेंडूवर स्मिथने कट करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या अगदी जवळ यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हमध्ये गेला. खेळाडूंनी जोरदार आवाहन केले, पण स्मिथ नाबाद असल्याचे कार्तिकला वाटले. रोहित शर्माने डीआरएस घेतला आणि तो बाद झाला. यानंतर रोहितने कार्तिकची मान पकडली आणि जोरजोरात त्याच्यावर ओरडतही होता.

बातम्या आणखी आहेत...