आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Rohit Sharma | India Vs England 3rd Test; After Rohit Sharma Wicket, Fan Jarvo Walks Out To Bat On Day 3 Of Headingley Test; News And Live Updates

'क्रिकेट वेडा':रोहित बाद झाल्यावर लीड्सच्या मैदानात घुसला टीम इंडियाचा चाहता; म्हणाला- मला बॅटिंग करू द्या, गार्ड्सने काढले बाहेर

लीड्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 48 व्या षटकात घडली घटना .

भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समध्ये कसोटी सामना सुरु आहे. आज तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्वतःला टीम इंडियाचा चाहता म्हणवणाऱ्या जारवो हा फलंदाजी करण्यासाठी क्रिजवर पोहोचला. तो भारतीय जर्सीमध्ये होता यावेळी त्याने पॅड, हेल्मेट आणि हातमोजेही घातले होते. त्यामुळे त्यांच्यावर कोणालाच शंका आली नाही. तो सहजपणे खेळपट्टीवर पोहोचला आणि फलंदाजीसाठी सज्ज झाला. परंतु, पंचाने त्याला पाहिले आणि त्याला बाहेर केले.

48 व्या षटकात घडली घटना
कसोटी सामन्यादरम्यान, ही घटना 48 व्या षटकात घडली. रोहित शर्मा 48 व्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर ऑली रॉबिन्सनच्या चेंडूवर बाद झाला. रोहित निघून गेल्यानंतर कर्णधार कोहलीच्या आगमनादरम्यान जारोव मैदानाच्या आत कपडे घालून आला. अशा परिस्थितीत सुरक्षा रक्षकांना वाटले की, एक भारतीय फलंदाज असून तो फलंदाजी करण्यासाठी आला आहे.

जारोव्हने लॉर्ड्स कसोटीत मैदानात प्रवेश केला होता
विशेष म्हणजे जारोव्ह यापूर्वीही भारतीय जर्सीमध्ये मैदानात उतरला आहे. दरम्यान, मैदानात उतरल्यानंतर तो भारतीय संघासाठी खेळतो म्हणून सांगितले. जारोव्हने सोशल मीडियावर आपली ओळख उघड केली. तो म्हणाला की, एका वापरकर्त्याने त्याचे काही फोटो शेअर करत त्याचे नाव जारोव्ह असल्याचे सांगितले होते. तेंव्हापासून तो आपले नाव जारोव्ह असल्याचे सांगतो.

बातम्या आणखी आहेत...