आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांगलादेशविरुद्ध 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा संशयाच्या भोवऱ्यात आहे. कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बुधवारी कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीबाबत माहिती दिली आणि सांगितले की, रोहित बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खेळणार नाही.
त्याच्या कसोटी खेळण्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्याच्या कसोटी खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
राहुलच्या या विधानानंतर रोहित कसोटी मालिका खेळणार नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. भारत-अ चे कर्णधार असलेला अभिमन्यू ईश्वरन त्याची जागा घेऊ शकतो असे मानले जात आहे. मात्र, याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
बुधवारी मीरपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेदरम्यान रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर तो मुंबईला परतला आहे.
अनऑफिशियल कसोटीमध्ये उत्कृष्ट कामगिरी
भारत अ संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन बांगलादेश दौऱ्यावर चांगलाच फॉर्मात आहे. त्याने टीम इंडिया अ संघासाठी दोन्ही अनऑफिशियल कसोटीमध्ये शतके झळकावली आहेत. अशा स्थितीत निवड समिती त्याला संधी देऊ शकते.
अभिमन्यूने झळकावली आहेत फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 17 शतके
27 वर्षीय अभिमन्यू ईश्वरने फर्स्ट क्लास, लिस्ट-ए आणि टी-20 यासह 25 शतके झळकावली आहेत. त्याने आतापर्यंत 77 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 44 च्या सरासरीने 5419 धावा केल्या आहेत.
यादरम्यान त्याने 17 शतके आणि 23 अर्धशतके केली आहेत, म्हणजेच त्याने 40 वेळा 50 पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळली आहे. त्याने 233 धावांची मोठी खेळीही खेळली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.