आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Rohit Sharma On IND Vs PAK Asia Cup Final | Know Asia Cup Final Qualification Chances, Team India's Loss To Sri Lanka After Pak: The Doors To The Finals Are Almost Closed; Find Out, What Paths Are Left For The Final Round

पाकनंतर ​​​​​​श्रीलंकेकडूनही टीम इंडियाचा पराभव:फायनलचे दरवाजे जवळपास बंद; जाणून घ्या, अंतिम फेरीसाठी काय आहे शक्यता

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अफगाणिस्तान-पाकिस्तान सामना शारजाहच्या मैदानावर संध्याकाळी साडेसातपासून खेळवला जाईल. - Divya Marathi
अफगाणिस्तान-पाकिस्तान सामना शारजाहच्या मैदानावर संध्याकाळी साडेसातपासून खेळवला जाईल.

मंगळवारी रात्री आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेकडून सुपर-4 सामन्यात पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया अंतिम फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे. पण, संघाचा कर्णधार रोहित शर्मा अजूनही भारत-पाकिस्तान फायनलसाठी आशावादी आहे.

सामन्यानंतर जेव्हा मीडियाने रोहितला विचारले- 'तुम्ही भारत-पाक फायनल मिस करत आहात का?' त्यावर रोहित म्हणाला- होईल ना , तूम्ही का टेन्शन घेत आहात? होईल होईल टेंशन घेऊ नका’’

अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला भारताच्या फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो ते सांगतो ...जाणून घ्या

जर भारताला अंतिम फेरीचे तिकीट मिळवायचे असेल तर काही अटीची पूर्तता करावी लागेल.

पहिल्यांदा भारताने शेवटचा सुपर लीग सामना जिंकला पाहिजे. दुसरा म्हणजे पाकिस्तानने त्यांच्या दोन्ही सुपर लीग हारले पाहिजेत. म्हणजेच अफगाणिस्तानने आज पाकिस्तानचा पराभव केला पाहिजे. आणि 9 सप्टेंबरला श्रीलंकेनेही पाकिस्तानला हरवायला हवे. तसेच टीम इंडियाची रनरेट सर्वाधिक असायला हवे.

कारण, पहिल्या चार अटींची पूर्तता केल्यास श्रीलंका 6 गुणांसह अव्वल स्थानावर असेल आणि भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी दोन गुण होतील. या तिन्ही संघांमध्ये भारताचा निव्वळ रनरेट सर्वोत्तम असणे आवश्यक आहे.

आता तपशीलवार समजून घ्या...

1. भारताने अफगाणिस्तानला हरवले पाहिजे

भारताचा तिसरा आणि शेवटचा सुपर-4 सामना 8 सप्टेंबर रोजी दुबईत होणार असून हा सामना भारतासाठी जिंकणे आवश्यक आहे. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे दोन्ही सुपर-4 सामने गमावले आहेत आणि ते सुपर-4 गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. भारताच्या या विजयामुळे त्यांच्या गुणतालिकेत 2 गुण होतील आणि अफगाणिस्तान सुद्धा भारताच्या बरोबरीचे दोन सामने गमावलेला असेल.

2. पाकिस्तान सुपर लीगचे दोन्ही सामने हरावे लागेल

सुपर लीगच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. त्यामुळे त्याचे 2 गुण आहेत. अशा स्थितीत आणखी एक विजय त्याला अंतिम फेरीत घेऊन जाईल. त्यामुळे आता भारताला पाकिस्तानचे दोन्ही सुपर लीग सामने हरणे आवश्यक झाले आहे. पाकिस्तानने दोन्ही सामने गमावल्यास, त्यानंतर केवळ 2 गुण शिल्लक राहतील आणि तो संघ भारताच्या बरोबरीने असेल.

3. अफगाणिस्तानने आज पाकिस्तानचा पराभव केला पाहिजे

अफगाणिस्तान संघाने बुधवारी पाकिस्तानचा पराभव केला पाहिजे. त्याच्या विजयावरच भारताच्या अंतिम आशा जिवंत राहतील. पाकिस्तानने हा सामना जिंकल्यास भारत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. अफगाणिस्तानने पहिला सुपर-4 सामना गमावला आहे. अशा स्थितीत आज अफगाणिस्तानच्या विजयामुळे भारताचे नुकसान होणार नाही.

4. शेवटचा सामना श्रीलंकेने जिंकला पाहिजे

श्रीलंकेने सुपर 4 चे दोन्ही सामने जिंकले आहेत. त्याच्याजवळ 4 गुण असून तो अव्वल स्थानावर आहे. आणखी एक विजय त्याला अंतिम फेरीचे तिकीट देईल. त्यानंतर दुसरी स्पर्धा ही फायनलसाठी असेल.

5. फक्त चांगला रन रेट अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत करेल

पहिल्या 4 अटी पूर्ण झाल्यास, श्रीलंका 6 गुणांसह अंतिम फेरीत पोहोचेल आणि उर्वरित तीन संघांचे 2-2 गुण समान असतील. अशा स्थितीत चांगल्या धावसंख्येमुळे भारताला अंतिम फेरी गाठण्याची संधी असेल.

बातम्या आणखी आहेत...