आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित शर्माचे शास्त्रींवर पलटवार:माजी मुख्य कोचवर भडकला कर्णधार रोहित, उघडपणे म्हणाला-'बकवास'

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कर्णधार रोहित शर्माने माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियावर केलेल्या टीकेला 'बकवास' असे संबोधले, ज्यात पूर्व कोच म्हणाले होते की, भारतीय संघ हा अतिआत्मविश्वासामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदूर कसोटी सामना हरला.

शास्त्री 2014 नंतर सातपैकी 6 वर्षे भारतीय संघाचे मुख्य कोच होते. तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून भारताच्या नऊ गडी राखून झालेल्या पराभवावर भाष्य करताना ते म्हणाले होते की भारतीय संघ थोडा आत्मसंतुष्ट आणि अतिआत्मविश्वासामुळे पराभूत झाला होता, जिथे त्यांनी गोष्टी गृहीत धरल्या होत्या

कर्णधार रोहित शर्मा रवी शास्त्रीवर संतापला

कर्णधार रोहितने गेल्या 18 महिन्यांत शांतता, संयम आणि आपल्या खेळाचा दर्जा कायम ठेवला आहे. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्याबाबत माजी कोचच्या केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, रोहितने ठामपणे उत्तर दिले. चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित म्हणाला, 'खर सांगू, जेव्हा तुम्ही दोन सामने जिंकता तेव्हा बाहेरच्या लोकांना वाटते की आम्ही अतिआत्मविश्‍वासात आहोत. हा पूर्णपणे बकवास आहे. कारण तुम्ही दोन सामने जिंकता त्यावेळी इतर सामन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करायची असते.

या प्रकरणाबद्दल जाहीरपणे 'बकवास’' असे सांगीतले

रोहित म्हणाला, 'दोन सामने जिंकल्यानंतर तूम्हाला थांबायचे नसते. ही गोष्ट तितकीच सोपी आहे. खरे तर हे सर्व लोक जेव्हा अतिआत्मविश्वासाबद्दल बोलतात आणि विशेषत: जेव्हा ते ड्रेसिंग रूमचा भागही नसतात तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये कोणत्या प्रकारची चर्चा झाली हे त्यांना माहित नसते.'' रोहितचे हे उत्तर विशेष म्हणजे अशा व्यक्तीच्या टीकेला उत्तर होते जे यापूर्वी टीम इंडियाचा मुख्य कोच होते.

यावर कर्णधार रोहित संतापला

भारतीय कर्णधार म्हणाला, “आम्हाला सर्व सामन्यांमध्ये आमचे सर्वोत्तम द्यायचे आहे आणि जर तो बाहेरच्या व्यक्तीला अतिआत्मविश्वास किंवा असे काही वाटत असेल तर आम्हाला काही फरक पडत नाही.” “या ड्रेसिंग रूममध्ये शास्त्री स्वतः ड्रेसिंगरूमचे भाग राहिले आहेत आणि त्यांना चांगल्याप्रकारे माहित आहे की जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपली मानसिकता कशी असते ते.

हे अतिआत्मविश्वास नसून रूथलेस असण्याबद्दल आहे. रूथलेस हा शब्द प्रत्येक क्रिकेटपटूच्या मनात येत आणि तो परदेश दौऱ्यावर असताना विरोधी संघाला किंचितही संधी न देण्याशी संबंधित आहे. विदेशात गेल्यावर आम्हालाही तेच वाटतं.

बातम्या आणखी आहेत...