आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुसऱ्या सामन्यातून गवसलेली विजयाची लय कायम ठेवण्याच्या इराद्याने यजमान टीम इंडिया अापल्या घरच्या मैदानावर उतरणार अाहे. भारत अाणि इंग्लंड यांच्यात तिसरा टी-२० सामना अहमदाबादच्या नवीन स्टेडियमवर अाज मंगळवारी हाेणार अाहे. या सामन्यासाठी अाता सलामीवीर रोहित शर्माचे यजमान संघात पुनरागमन हाेण्याचे चित्र अाहे. यासाठी रोहित शर्माही सज्ज झालेला अाहे. दुसरीकडे लोकेश राहुलचे संघातील स्थान अडचणीत सापडले. त्यामुळे त्याला विश्रांती देऊन राेहितचे कमबॅक करण्यावर टीम इंडिया विचार करत अाहे.
ईशान किशन व विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडला गत सामन्यातील पराभवाची परतफेड केली. सलामीला अाठ गड्यांनी पराभव पत्करणाऱ्या टीम इंडियाने दुसरा सामना सात गड्यांनी जिंकला. त्यामुळे अाता हीच विजयाची लय कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया उत्सुक अाहे.
राेहित शर्मा गत दाेन सामन्यांपासून संघाबाहेर अाहे. तसेच धवनला गत सामन्यात विश्रांती देण्यात अाली. ईशान किशनने संधीला सार्थकी लावताना अर्धशतक झळकावले. दुसरीकडे लाेकेश राहुल अपयशी ठरला.
विराटच्या विश्रांतीची चर्चा :
कर्णधार विराट कोहलीला अाता विश्रांती देण्याची चर्चा अाहे. त्याने इंग्लंडविरुद्ध सर्वच सामने खेळले. याशिवाय ताे वनडे मालिकेत नेतृत्व करणार अाहे. त्यानंतर अायपीएलसाठी ताे मैदानावर उतरणार अाहे. त्यामुळे त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.
माेईन अलीला मिळेल संधी :
ईशान किशन व यष्टिरक्षक फलंदाज ऋषभला राेखण्यासाठी अाता इंग्लंडचा संघ अाॅफ स्पिनर अाॅलराउंडर माेईन अलीला संधी देण्याची शक्यता अाहे. दुखापतीने मार्क वुड हा खेळू शकला नाही. त्याचे चाैथ्या सामन्यापर्यंत पुनरागमन कठीण अाहे.
भारतीय संघाला दंड
भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात संंथ गोलंदाजी केली. त्यामुळे टीमवर सामना निधीच्या २० टक्के रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात अाली. यजमान संघाने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकले. त्यामुळे ही कारवाई करण्यात अाली. कर्णधार विराट काेहलीने ही चूक मान्य केली. त्यामुळे ही कारवाई झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.