आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटी-20 वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. केवळ टी-20 नव्हे, तर वनडे टीमचा देखील तो कॅप्टन ठरू शकतो. सद्यस्थितीला कर्णधार असलेला विराट कोहली आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष देण्याचा विचार करत आहे. त्याच विचारातून तो टी-20 आणि वनडे टीमची जबाबदारी रोहितला सोपवू शकतो. टाइम्स ऑफ इंडियाने बीसीसीआयच्या सूत्रांचा दाखला देत दिलेल्या माहितीनुसार, टी-20 विश्व चषक संपल्यानंतर विराट कर्णधार पद सोडण्याची घोषणा करणार आहे.
एवढेच नव्हे, तर विराटने यासंदर्भात टीम व्यवस्थापनाशी रोहितला कशी जबाबदारी देता येईल यावर चर्चा केली आहे. महेंद्र सिंह धोनीच्या पावलावर पाऊल ठेवून विराट सुद्धा आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष देण्यासाठी कॅप्टनशिप सोडू इच्छित आहे. धोनीने सुद्धा याच कारणास्तव विराटला कॅप्टन केले होते. यासाठी विराट रोहितवर विश्वास दाखवत आहे.
कॅप्टनशिपच्या दबावामुळे बॅटिंगवर परिणाम
टी-20, वनडे आणि टेस्ट सामन्यांमध्ये सुद्धा विराटच्या बॅटिंगवर कॅप्टनशिपचा दबाव दिसून येतो. विराटने टेस्टमध्ये शेवटचा शतक नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकला होता. फलंदाजी सुधारण्यासाठी कॅप्टनशिपच्या जबाबदारीतून मुक्त व्हावे लागेल असे विराटला वाटते. त्यातच 2022 आणि 2023 मध्ये टीम इंडियाला वनडे आणि टी-20 असे दोन्ही वर्ल्ड कप खेळायचे आहेत. अशात विराटने आपल्या बॅटिंगवर फोकस करणे टीमसाठी देखील आवश्यक आहे.
रोहितच्या नेतृत्वात 5 विजय
रोहित शर्माच्या नेतृत्वात इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने 5 वेळा चषक जिंकले आहे. अशात कोहलीने कर्णधार पद सोडल्यानंतर रोहित शर्मा सर्वात प्रबळ दावेदार आहे. रोहित शर्मा सध्या भारतीय क्रिकेट संघाचा उप-कर्णधार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.