आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:रोहितची ३० महिन्यांनंतर वनडे क्रमवारीत नंबर-२ वरून घसरण, विराट अव्वल

दुबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय उपकर्णधार रोहित शर्माची आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाने घसरण होत, तो तिसऱ्या स्थानी पोहोचला. रोहितने जानेवारी २०२० नंतर मंगळवारी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामना खेळला. त्याचे ८३६ गुण झाले. सप्टेंबर २०१८ नंतर पहिल्यांदा रोहित दुसऱ्या स्थानावरून बाजूला झाला. पाकचा बाबर आझम ८३७ गुणांसह दुसऱ्या व भारतीय कर्णधार विराट कोहली ८६८ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. इंग्लंडच्या बेअरस्टोने सातवे स्थान गाठले. टी-२० च्या फलंदाजी क्रमवारीत विराट कोहली चौथ्या स्थानी पोहोचला. मालिकेपूर्वी लोकेश राहुल पाचव्या स्थानी होता.

वनडे फलंदाजी क्रमवारी
क्र खेळाडू देश गुण
1 विराट भारत 868
2 बाबर पाक 837
3 रोहित भारत 836
4 टेलर न्यूझीलंड 810
5 फिंच ऑस्ट्रेलिया 791

टी-20 फलंदाजी क्रमवारी
क्र खेळाडू देश गुण
1 मलान इंग्लंड 892
2 फिंच ऑस्ट्रेलिया 830
3 बाबर पाकिस्तान 801
4 विराट भारत 762
5 राहुल भारत 743

बातम्या आणखी आहेत...