आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Root's Century Paved The Way For England's Strong Lead; At The End Of The Day, England Were 423 For Eight

तिसरी कसाेटी:रुटच्या शतकाने इंग्लंडच्या मजबूत आघाडीचा मार्ग सुकर; इंग्लंडच्या दिवसअखेर 8 बाद 423 धावा

लीड्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान इंग्लंड क्रिकेट संघाने गुुरुवारी टीम इंडियाविरुद्ध तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात माेठी आघाडी घेतली. सलामीवीर राॅरी बर्न्स (६१), हसीब हमीद (६८), डेव्हिड मलान (७०) यांच्या अर्धशतकांपाठाेपाठ कर्णधार ज्याे रुटने (१२१) दमदार शतकी खेळीतून आपल्या इंग्लंड टीमची ३४५ धावांची आघाडी निश्चित केली. इंग्लंड संघाने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ८ गड्यांच्या माेबदल्यात ४२३ धावा काढल्या. भारताकडून माे. शमीने तीन, माे. सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराहने संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. त्याने इंग्लंडचा कर्णधार आणि शतकवीर रुटला बाद केले. त्यामुळे इंग्लंड टीमच्या माेठ्या आघाडीच्या खेळीला ब्रेक लागला. आता क्रेग आेव्हर्टन (२४) आणि आेली राॅबिन्सन (०) मैदानावर आहेत. दरम्यान जाॅनी बेअरस्टाेने २९ धावांची खेळी केली.

भारतीय संघाला पहिल्या डावात ७८ धावांत गुंडाळणाऱ्या इंग्लंडने दुसरा दिवस गाजवला. टीमने कालच्या बिनबाद १२० धावांवरून दुसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. बर्न्स आणि हमीदने १३५ धावांच्या भागीदारीची सलामी दिली.दरम्यान, दाेघांनी वैयक्तिक अर्धशतक साजरी केली. हीच लय कायम ठेवत मलानने अर्धशतक व रुटने शतक झळकावले. या दाेघांनी शानदार खेळी करताना १३९ धावांची भागीदारी रचली. यासह त्यांनी संघाच्या धावसंख्येला गती दिली. दरम्यान, संघाच्या डेव्हिड मलानने १२८ चेंडूंत ११ चाैकारांसह शानदार ७० धावांची खेळी केली.

रुटची विक्रमी खेळी : सत्रात सर्वाधिक धावांसह एक कॅलेंडर वर्षात भारतविरुद्ध चार शतके
इंग्लंडचा कर्णधार ज्याे रुटने गुरुवारी आपल्या पदाला साजेशी खेळी केली. सलामीच्या जाेडीने केलेली दमदार सुरुवात त्याने कायम ठेवताना आपल्या टीमला माेठी आघाडी मिळवून दिली. यादरम्यान त्याने करिअरमधील २३ वे कसाेटी शतकही साजरे केले. १२१ धावांची खेळी करत त्याने विक्रमाचा माेठा पल्लाही गाठला. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये रुटने यंदाच्या सत्रामध्ये सर्वाधिक धावांचा पल्ला गाठला. आता त्याच्या नावे २०२१ मध्ये १३९८ धावा झाल्या आहेत. तसेच रुटने टीम इंडियाविरुद्ध एका कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक चार शतके साजरी केली आहेत. यासह ताे आघाडीवर आहे. याशिवाय त्याने शानदार खेळीची लय कायम ठेवताना मालिकेत चाैथ्यांदा ५० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...