आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉस टेलरने घेतला क्रिकेटचा निरोप:अंतिम सामन्यादरम्यान, राष्ट्रगीत ऐकून हमसून हमसून रडला, 14 धावा करून झाला बाद

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेदरलँड्सविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना हा रॉस टेलरच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यामुळेच राष्ट्रगीत सुरू असताना टेलर रडू लागला आणि त्याचे अश्रू थांबत नव्हते. टेलरला असे पाहून मैदानात उपस्थित लोकही भावूक झाले.

राष्ट्रगीतावेळी न्यूझीलंडचा महान खेळाडू टेलर आपल्या मुलांसोबत उपस्थित होता. खरे तर, टेलरने नेदरलँड्सविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माघार घेणार असल्याचे आधीच जाहीर केले होते.

2 महिन्यांपूर्वी शेवटची कसोटी खेळली
बांगलादेशविरुद्ध जानेवारीमध्ये खेळलेल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यातही टेलरने गोलंदाजी केली आणि विकेट घेण्यात यशस्वी ठरला. न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूने आपल्या वनडे करियरमध्ये 236 सामने खेळले आहेत आणि या कालावधीत त्याने 8607 धावा केल्या आहेत. 2006 मध्ये, टेलरने वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. टेलर हा न्यूझीलंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

एक काळ असा होता की क्रिकेटच्या जगात टेलरची भीती गोलंदाजांना वाटायची. सुरुवातीला थोडा वेळ घेतल्यानंतर टेलर सेट झाला की तो कोणत्याही गोलंदाजीचा धुव्वा उडवत असे.

वनडेमध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक शतके आणि अर्धशतके
टेलरने कसोटी क्रिकेटमध्ये 7584 धावा केल्या. त्याचवेळी, टेलर हा न्यूझीलंडकडून वनडेमध्ये सर्वाधिक शतके आणि अर्धशतकं करणारा फलंदाज आहे. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत त्याने 21 शतके आणि 51 अर्धशतके केली आहेत.

फेअरवेल मॅचमध्ये बॅटची जादू चालली नाही
नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात टेलरला फार काही करता आले नाही आणि केवळ 14 धावा करून तो बाद झाला. पण इतिहास त्याला या एका डावासाठी नव्हे तर 16 वर्षांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी लक्षात ठेवेल.

टेलरने आयपीएलच्या 55 सामन्यांमध्ये 124 च्या स्ट्राईक रेटने 1017 धावा केल्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 81 होती.

वनडेमध्ये 72 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या
रॉस टेलरने आपल्या फलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळी छाप सोडली. न्यूझीलंडचा हा 38 वर्षीय क्रिकेटपटू नेहमीच खेळासाठी समर्पित होता.

न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हॅमिल्टन येथे खेळवला जात आहे. किवी टीम मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहेत. टेलरने आधीच घोषणा केली होती की तो 2022 च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. मात्र, तो सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे.

पहिला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघातही त्याचा समावेश होता. न्यूझीलंडने अंतिम फेरीत भारताचा पराभव केला होता. रॉस टेलरने 72 वेळा वनडेमध्ये 50 पेक्षा जास्त धावांची खेळी खेळली आहे. नाबाद 181 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

न्यूझीलंडसाठी सर्वाधिक सामने खेळले
रॉस टेलर फेब्रुवारी 2020 मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये 100-100 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला. न्यूझीलंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा तो खेळाडू आहे. त्याने एकूण 292 टी-20 सामन्यांमध्ये 31 च्या सरासरीने 6429 धावा केल्या आहेत.

T20 फॉरमॅटमध्ये त्याने 1 शतक आणि 32 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 111 ही त्याची सर्वात मोठी खेळी आहे. त्याने 27 शतकांच्या मदतीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 12 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...