आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महिला क्रिकेट :महिला क्रिकेटला रोमांचक बनवण्यासाठी नियमात होऊ शकतो बदल; चेंडू हलका-खेळपट्टी छोटी केली जाऊ शकते

दुबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यूझीलंडची सोफिया डेविनी व भारताची जेमिमा रॉड्रिग्जची आयसीसी वेबिनारमध्ये सूचना
  • खेळपट्टी छोटी करून महिला क्रिकेटला चाहत्यांच्या दृष्टीने अधिक रोमांचक बनवले जाऊ शकते?

महिला क्रिकेटला रोमांचक बनवण्यासाठी नियमात काही बदल केले जाऊ शकतात. त्यात छोट्या, हलक्या चेंडूचा प्रयोग आणि खेळपट्टीची लांबी कमी करण्याचे मुद्दे आहेत. काही दिवसांपूर्वी आयसीसीने वेबिनार आयोजित केला होता. यात न्यूझीलंडची कर्णधार सोफिया डेविनी आणि भारताची जेमिमा रॉड्रिग्जने आपल्या सूचना केल्या. खेळपट्टी २२ ऐवजी २० यार्ड केली जाऊ शकते. अशाच प्रस्तावावर जगातील इतर मोठ्या खेळाडूंनी आपले मतप्रदर्शन केले. त्यांच्या चर्चेतील काही भाग...स्मृती मानधना (भारतीय फलंदाज) : महिला व पुरुष क्रिकेटरचा विचार केल्यास दोघांत केवळ खेळपट्टीतील अंतर समान आहे. महिला क्रिकेट मधील चेंडूचे वजन १४०-१५१ ग्रॅम व पुरुष क्रिकेटमध्ये चेंडूत १५५.९-१६३ ग्रॅम असते. सध्या महिला क्रिकेटपटूंमध्ये गोलंदाजीचा वेग १२० ते १२५ किमी प्रतितास आहे. खेळपट्टी छोटी केली तर तो वेग १३० ते १३५ किमी प्रतितास होईल. त्यानंतर वेगवान गोलंदाजी पाहण्यासारखी होईल.


चेंडू छोटा व हलका केल्यानंतर खेळ रोमांचक होण्याची अाशा आहे?


मानधना : अनेक खेळाडूंचे हात छोटे आहेत. पूनम यादवचा देखील. अशात झेल घेण्यास अडचण येते. त्यामुळे लागू करावे.
दिव्य मराठी विशेष


केटी : हा चांगला पर्याय आहे. महिलांचे हात पुरुषांपेक्षा छोटे असतात. आकारापेक्षा जास्त प्रभाव त्यांच्या वजनामुळे पडेल.


दार : हलक्या चेंडूने स्पिनर अधिक ड्रिफ्ट करेल. फिरकीपटूंचा प्रभाव वाढेल, षटकार मारणे कठीण जाईल. गोलंदाज भक्कम होतील.


ताहुहू : चेंडू लहान करणे मला समजत नाही. मात्र, चेंडू छोटा केल्यानंतर चेंडूवर पकड चांगली होईल, स्पिनला मदत मिळले.


हेन्स : फिरकीपटूंच्या हातात चेंडू योग्य बसला आहे. स्पिनरला मदतगार नसलेल्या खेळपट्टीवर त्याचा प्रयोग करायला हवा.

0