आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 वर्षांनंतर मध्य प्रदेश रणजीच्या अंतिम फेरीत:बंगालचा 174 धावांनी पराभव, कुमार कार्तिकेयने घेतले 5 बळी; मुंबईशी अंतिम टक्कर

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशने बंगालचा 174 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. मध्य प्रदेशने शेवटची वेळ 1999 मध्ये रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत त्याचा सामना मुंबईशी होणार आहे.

दुसऱ्या उपांत्य फेरीत मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर UPचा पराभव केला. मध्य प्रदेशने बंगालविरुद्ध पहिल्या डावात 341 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात बंगालचा संघ 273 धावाच करू शकला.

हिमांशू मंत्री ठरला सामनावीर

पहिल्या डावाच्या जोरावर मध्य प्रदेशने 68 धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात मध्य प्रदेशने 281 धावा केल्या. बंगालसमोर विजयासाठी 350 धावांचे लक्ष्य होते, मात्र दुसऱ्या डावात बंगालचा संघ केवळ 175 धावाच करू शकला.

मध्य प्रदेशसाठी पहिल्या डावात 165 धावा करणारा सलामीवीर हिमांशू मंत्रीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचवेळी कुमार कार्तिकेयने दुसऱ्या डावात 5 बळी घेतले.

मंत्रीचे शतक आणि अक्षत रघुवंशीच्या शानदार 63 धावांच्या जोरावर मध्य प्रदेशला पहिल्या डावात 341 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात मनोज तिवारी (102) आणि शाहबाज अहमद (116) यांच्या शतकी खेळीनंतरही बंगालचा डाव 272 धावांवर गारद झाला.

मध्य प्रदेशच्या दुसऱ्या डावात कर्णधार आदित्य श्रीवास्तव (82) आणि रजत पाटीदार (79) यांच्या अर्धशतकांमुळे मध्य प्रदेशला दुसऱ्या डावात 281 धावा करता आल्या.

यापूर्वी 1999 मध्ये एमपी संघाने कर्नाटकविरुद्ध एकमेव अंतिम सामना खेळला होता.

मुंबईसाठी यशस्वी जायसवालची दमदार कामगिरी

दुसऱ्या उपांत्य फेरीत मुंबईच्या संघाने 393 आणि 533 अशी डोंगराएवढी धावसंख्या केली. त्याचवेळी उत्तर प्रदेशचा संघ केवळ 180 धावा करू शकला. अशा स्थितीत मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला आणि संघाने अंतिम फेरी गाठली. मुंबईकडून यशस्वी जायसवालने दोन्ही डावात शानदार शतक झळकावले. त्याने पहिल्या डावात 100 तर दुसऱ्या डावात 181 धावा केल्या. तो सामनावीरही ठरला.

बातम्या आणखी आहेत...