आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Road Safty World Series, Sachin Get Emotional Seeing Photos In Visitors' Gallery : Online Tickets For Kanpur Match Cancelled; India VS South Africa Legends Match Today

प्रेक्षक गॅलरीत फोटो पाहून सचिन भावूक:सामन्याची ऑनलाइन तिकिटे रद्द; भारत VS दक्षिण आफ्रिका लीजेंड्स आज सामना

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा हंगाम 10 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून पहिला सामना इंडिया लिजेंड्स विरूद्ध दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यात खेळला जाईल. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी ऑनलाइन विक्री झालेली तिकिटे रद्द करण्यात आली आहेत.

खरं तर BookMyShow आणि आयोजक यांच्यात तिकीटच्या वितरणाबाबत झालेल्या वादानंतर शुक्रवारी रात्री उशिरा हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ज्यांनी ऑनलाईन तिकिटे घेतली होती, त्यांची तिकिटे रद्द करून त्यांचे पैसे परत करण्यात आले आहेत. आता फक्त ऑफलाईन तिकिटेच मिळणार आहेत.

प्रेक्षक गॅलरीत फोटो पाहून सचिन झाला भावूक

स्पर्धेच्या एक दिवस आधी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ग्रीन पार्क इथल्या प्रेक्षक गॅलरीला भेट दिली. याठिकाणी दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्यात आल्या आहेत. सचिन गॅलरी पाहण्यासाठी आला तेव्हा त्याच्यासोबत भारतीय संघाचे इतर खेळाडूही उपस्थित होते. गॅलरीत त्याचे जुने फोटो, बातम्यांचे कात्रण पाहून सचिन भावूक झाला. हे पाहून सचिन म्हणाला असा आनंद पुन्हा येथेच पाहायला मिळेल

आज स्टेडियमच्या गेट क्रमांक 10 वरून तिकिटे मिळतील

आज म्हणजेच शनिवारी सामन्यासाठी परमट गेट क्रमांक 10 C येथे तिकीट काउंटर उभारले जाणार आहे.ऑनलाईन ज्यांना पैसे परत केले गेले. त्यांना तिकीट दिले जाईल. तसेच ज्यांचे पैसे परत मिळाले नाहीत, त्यांना दुसरे तिकीट दिले जाणार आहे.

शनिवारपासून ही ऑफलाइन तिकिटांची विक्री सुरू होणार आहे. 11 ते 15 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची शहरातील पाच काउंटरवरून विक्री केली जाणार आहे. मॉल रोड, मोतीझील, साउथ सिटीसह जिल्ह्यात पाच ठिकाणी काउंटर लावून तिकीट विक्री केली जाणार आहे.

विशेष सांगायचे म्हणजे आयोजकांच्या वतीने BookMyShow ला तिकीट वेंडिंग पार्टनर बनवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बुकिंग म्हणून केवळ 2 ते 3 लाख रुपये देण्यात आले.

शुक्रवारी, BookMyShow च्या व्यवस्थापनाने उर्वरित रकमेबद्दल विचारले असता, आयोजकांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने कंपनीने तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतला..

श्रीलंका लिजेंड्स संघ कानपूरच्या वाहतूक कोंडीत अडकला

शुक्रवारी ग्रीन पार्कवरून परतणारा श्रीलंका लीजेंड्सची टीम VIP रोडवर वाहतूक कोंडीत अडकला. रॉयल क्लिफ हॉटेलकडे जाताना खेळाडूंची बस तासभर वाहतूक कोंडीतअडकली होती.

यावेळी आजूबाजूच्या लोकांनी हस्तांदोलन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. अथक परिश्रमानंतर पोलिसांनी बस जाममधून बाहेर काढली. सुमारे 4 तास VIP रोडवर 2 किलोमीटर लांब जाम होता.

आयोजकांमध्ये समन्वयाचा अभाव,कोणत्याही वेळापत्रकाशिवाय सामील होताहेत नवीन संघ

शहरातील ग्रीन पार्कमध्ये शनिवारपासून सुरू होणाऱ्या रोड सेफ्टी सिरीज टूर्नामेंट निष्काळजीपणामुळेच जास्त चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. सिरीजच्या आयोजकांकडून अचानक नव्या सत्राची यादी पुन्हा पाठवण्यात आली आहे.

ज्यामध्ये बांग्लादेशच्या टीमचा नव्याने समावेश करण्यात आला होता . यानंतर बांग्लादेशचे काही खेळाडू दुपारी सरावासाठी मैदानावर पोहोचली होती, ते फक्त 45 मिनिटांमध्ये हॉटेलसाठी सराव न करता रवाना झाले.

शहरात होणाऱ्या सामन्यांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी सदोष व्यवस्थापनामुळे समोर येत आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत होणाऱ्या नेटच्या सरावातही खंड पडला आहे. यावेळी श्रीलंकेच्या टीमला सराव करायचा होता. मात्र 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त हवामान असल्यामुळे सराव संध्याकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आला..

ग्रीन पार्क हॉस्टेलच्या खेळाडूंनी युसूफ पठाणला नेटवर सराव करायला लावला.
ग्रीन पार्क हॉस्टेलच्या खेळाडूंनी युसूफ पठाणला नेटवर सराव करायला लावला.
निवृत्तीनंतरचा पहिला सामना सुरेश रैना कानपूरमध्ये खेळणार आहे. शुक्रवारी त्याने नेट सराव केला.
निवृत्तीनंतरचा पहिला सामना सुरेश रैना कानपूरमध्ये खेळणार आहे. शुक्रवारी त्याने नेट सराव केला.
हॉटेलमध्ये पोहोचलेल्या कर्मचार्‍यांनी युवराज सिंगचे स्वागत केले.
हॉटेलमध्ये पोहोचलेल्या कर्मचार्‍यांनी युवराज सिंगचे स्वागत केले.
शुक्रवारी जॉन्टी रोड्सही त्याच्या टीमसोबत कानपूरला पोहोचला.
शुक्रवारी जॉन्टी रोड्सही त्याच्या टीमसोबत कानपूरला पोहोचला.

कार्तिक आणि श्रद्धा बॉलिवूड नाईटमध्ये परफॉर्म करणार आहेत

मलायका अरोरा किंवा सनी लिओनी बॉलीवूड नाईट ऑफ सेफ्टी वर्ल्ड सिरिजसाठी नोरा फतेहीची जागा घेऊ शकतात. खरं तर नोरा सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकली आहे. आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यन आणि श्रद्धा कपूर येण्याची आणि येथे परफॉर्म करण्याची शक्यता आहे.

सेफ्टी वर्ल्ड सिरिजची टीम-

भारताचे दिग्गज - सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंग, मुनाफ पटेल, एस बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, नमन ओझा, मनप्रीत गोनी, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, राजेश पवार आणि राहुल शर्मा .

दक्षिण आफ्रिका दिग्गज - जॉन्टी ऱ्होड्स (कर्णधार), अल्विरो पीटरसन, अँड्र्यू पुटिक, एडी ली, गार्नेट क्रूझर, हेन्री डेव्हिड, जॅक रुडॉल्फ, जोहान बोथा, जे व्हॅन डी वाथ, लान्स क्लुसेनर, एल नॉरिस जोन्स, मखाया एनटिनी, मॉर्न व्हॅन विक, टी शबाला, व्हर्नन फिलँडर आणि जेंडर डी ब्रुयन.

.

बातम्या आणखी आहेत...