आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Sachin Tendulkar Birth Anniversary Updates: God Of Cricket Sachin Tendulkar Birth Celebrate In Kerala Colleges; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढदिवस विशेष:क्रिकेटच्या देवाचे तेजोमय माहात्म्य, महाविद्यालयाचे ग्रंथालय ‘सचिनमय’; विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच लिटल मास्टरच्या पुस्तकांची मोठी पर्वणी

औरंगाबाद13 दिवसांपूर्वीलेखक: एकनाथ पाठक
  • कॉपी लिंक
  • केरळच्या कालिकत येथील महाविद्यालयात उपक्रम; सचिनचे आज 48 व्या वर्षात पदार्पण

क्रिकेटचा देव’ म्हणून क्रीडाविश्वातील सचिन तेंडुलकरचे माहात्म्य अद्यापही तसेच तेजाेमय अाहे. क्रिकेटच्या मैदानावरील अापल्या लाडक्या सचिनची फलंदाजी पाहण्यासाठी हातचे काम साेडून, तर हातातील पुस्तक बंद करून क्लास बंक करणारे असंख्य सचिनप्रेमी चाहते अाहेत. हीच कामगिरी शब्दरूपात पुस्तकबद्ध झाली. निवृत्तीनंतरही त्याची लाेकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. क्रिकेटवेड्या विद्यार्थ्यांमधील सचिनबराेबरचा प्रेमाचा अाेलावा असाच कायम ठेवण्यासाठी केरळच्या एका महाविद्यालयाने वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. उत्तर केरळातील कालिकत येथील मलबार क्रिस्तयेन महाविद्यालयाने अापले ग्रंथालय चक्क सचिनमय करून टाकले आहे.

यामध्ये जागतिक पातळीवरच्या सचिनवर अातापर्यंत लिहिण्यात अालेल्या सर्वच पुस्तकांचा समावेश अाहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर अाज शनिवारी ४८ व्या वर्षात पदार्पण करत अाहे. महाविद्यालयाच्या वतीने जानेवारी २०१६ पासून या उपक्रमाला सुरुवात झाली. येथील विद्यार्थ्यंाना शैक्षणिक अभ्यासाबराेबरच क्रिकेटच्या विश्वातील सचिनच्या अनमाेल याेगदानाची माहिती देणारी पुस्तके वाचण्याची पर्वणी मिळत अाहे. इतिहास विभागाचे प्राध्यापक एम. सी. वसिष्ठ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम महाविद्यालयात राबवला जात अाहे. यासाठी त्यांनी विविध भाषेतील व नामांकित लेखकांची पुस्तके मागवून घेतली.

उत्तर केरळातील कालिकत येथील मलबार क्रिस्तयेन महाविद्यालयाने अापले ग्रंथालय चक्क सचिनमय करून टाकले आहे.
उत्तर केरळातील कालिकत येथील मलबार क्रिस्तयेन महाविद्यालयाने अापले ग्रंथालय चक्क सचिनमय करून टाकले आहे.

मराठीसह प्रादेशिक ११ भाषेतील पुस्तके
मराठीसह प्रादेशिक ११ भाषेमधील सचिनवर लिहिण्यात अालेली पुस्तके या ग्रंथालयात अाहे. यात मल्याळम, गुजराती, कानडी, तामिळ, तेलगू, अाेरिया, बंगालसारख्या भाषेंचा समावेश अाहे. याशिवाय ग्रंथालयामध्ये सचिनच्या विविध १०० पुस्तकांच्या ५०० प्रती ठेवल्या अाहेत. देश-विदेशातील लेखकांनी सचिनवर लिहिलेल्या पुस्तकांचा यामध्ये समावेश अाहे. यावर माेठा खर्च करण्यात अाला.

महाविद्यालयाचे ‘शतक’ साजरे :
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या कालिकतमध्ये हे महाविद्यालय अाहे. १९०९ मध्ये हे महाविद्यालय या ठिकाणी सुरू करण्यात अाले. यात सचिनप्रेमी विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी माेठी अाेढ असते, असेही प्रा. वसिष्ठ यांनी सांगितले.

१३ अभ्यासक्रमांचे विभाग
महाविद्यालयामध्ये १३ अभ्यासीय विभाग अाहेत. यात इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्रजी, मल्याळम, जर्मनी, संस्कृत, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, वाणिज्य, पत्रकारिता विभागाचा समावेश अाहे.

बातम्या आणखी आहेत...