आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आता कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वी सचिनचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तो घरातच क्वारंटाइन होता, परंतु आता डॉक्टरांनी सचिनला रुग्णालयात दाखल होण्यास सांगिलते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिनने ही माहिती दिली आहे.
ट्विटरवर दिली माहिती
“माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार. दक्षता म्हणून मी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,”.
केकेआरचा नितीश राणा निगेटिव्ह
आयपीएल सत्र सुरू होण्यापूर्वीच कोलकाताचा फलंदाज नितीश राणा कोरोना पॉझिटिव्ह आढळला हाेता. सूत्रांनुसार, राणा गोव्यात सुटी घालवल्यानंतर संघात दाखल झाला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वीच त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. बीसीसीआय व केकेआरकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता ताे पुन्हा टीमसाेबत सराव करताना दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.