आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यष्टीरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहाला पत्रकाराने धमकावल्याच्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. साहाने एका पत्रकाराशी व्हॉट्सअॅपवर केलेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आणि पत्रकाराने मुलाखत देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे
साहाने पोस्ट केलेल्या स्क्रीन शॉटमध्ये लिहिले होते, 'तुम्ही माझ्यासोबत एक इंटरव्ह्यू करा. ते चांगले होईल. जर तुम्हाला लोकशाही पद्धतीने मुलाखत घ्यायची असेल तर मी तुम्हाला फोर्स करणार नाही. संघ व्यवस्थापनाने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत एका यष्टिरक्षकाची निवड केली आहे, जो माझ्या मते चांगला आहे. तुम्हीही सर्वोत्कृष्ट नसलेले 11 पत्रकार निवडले, जे माझ्या मते बेस्ट नव्हते. जे सर्वात जास्त मदत करू शकतात त्यांना निवडा.'
यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकाराने त्यांना व्हॉट्सअॅपवरच फोन केला. साहाने फोन रिसिव्ह न केल्याने पत्रकाराने रात्री उशिरा मेसेजमध्ये लिहिले की, 'तुम्ही फोन केला नाही. मी यापुढे तुमची कधीही मुलाखत घेणार नाही. मी असा अपमान सहन करू शकत नाही आणि मी ते लक्षात ठेवेन. तुम्ही असे नको करायला होते '
बीसीसीआय करणार चौकशी
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने संभाषणात सांगितले की, साहा अजूनही बीसीसीआयचा कंत्राटी खेळाडू आहे. अशा स्थितीत त्याच्या आरोपांना गांभीर्याने घेत बीसीसीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर खेळाडूंसोबतही असा प्रकार घडला आहे का, याचाही तपास केला जाणार आहे.
माजी प्रशिक्षकाने केली होती चौकशीची मागणी
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी साहाचे समर्थन करत चौकशीची मागणी केली होती. शास्त्री यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, एका खेळाडूला पत्रकाराकडून धमकावले जात आहे हे धक्कादायक आहे. हा त्याच्या पदाचा दुरुपयोग होता. टीम इंडियासोबत हे सातत्याने घडत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.