आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांनी रविवारी सकाळी वयाच्या 88 व्या वर्षी जामनगर येथील घरी अखेरचा श्वास घेतला. याची पुष्टी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. भारतीय संघाचे अष्टपैलू खेळाडू, दुर्रानी यांनी भारतासाठी 29 कसोटी खेळल्या आणि 1202 धावा केल्या आणि 75 बळी घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुर्रानी यांच्या नावावर 170 सामन्यांमध्ये 8545 धावा आणि 484 विकेट आहेत.
अफगाणिस्तानमध्ये जन्म झाला
सलीम दुर्रानी यांचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झाला. नंतर दुर्रानी यांचे कुटुंब कराचीत स्थायिक झाले. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी दुर्रानी यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले होते.
1961-62 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान
दुर्रानी हे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जात होते. 1961-62 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. शेवटच्या दोन कसोटीत सलीम यांनी भारताला विजयापर्यंत नेले. त्यांनी कोलकाता येथे आठ आणि चेन्नई कसोटीत दहा बळी घेतले. भारताने 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली.
अर्जुन पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू
सलीम दुर्रानी हे अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले क्रिकेटपटू होते. हा सन्मान त्यांना 1961 मध्ये मिळाला होता.
दुर्रानी यांच्या समर्थनार्थ चाहत्यांनी संघाला विरोध केला
दुर्रानी यांना चाहते खूप पसंत करत होते. 1973 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कानपूर कसोटीसाठी दुर्रानी याना संघातून वगळण्यात आले होते. यानंतर चाहत्यांनी स्टेडियममध्ये संघाचा निषेध केला. चाहत्यांनी कार्ड्स आणि बॅनरवर लिहिले - दुर्रानी नाही, कसोटी नाही. यानंतर दुर्रानी यांना मुंबई कसोटीत संधी मिळाली.
चित्रपटांमध्येही काम केले
सलीम दुर्रानी यांनी भारतासाठी शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी 1973 रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळला होता. यानंतर त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतही हात आजमावला. दुर्रानी यांनी 'चरित्र' या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.