आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवम (४/२२) आणि सामनावीर दीपक हुडाने (नाबाद ४१) शानदार खेळीतून मंगळवारी यजमान भारतीय संघाला सलामीला विजय मिळवून दिला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलामीच्या टी-२० सामन्यात दासुन शनाकाच्या श्रीलंका टीमला धूळ चारली. भारताने २ धावांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ गड्यांच्या माेबदल्यात श्रीलंकेसमाेर विजयासाठी १६३ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. प्रत्युत्तरात श्रीलंकेला १६० धावांपर्यंत मजल मारता आली.
यासह भारताने घरच्या मैदानावरील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील निर्णायक दुसरा सामना उद्या गुरुवारी पुण्यात हाेणार आहे. युवा बिग्रेडने दमदार खेळीतून नव्या वर्षाची विजयाने सुरुवात करून दिली. पदार्पणामध्ये शिवमने चार बळी घेतले. यजमान भारतीय संघाच्या सलामीवीर इशान किशनने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध सलामीचा टी-२० सामना गाजवला. त्याने पहिल्याच षटकात १६ धावांची कमाई केली. यासह ताे पहिल्या षटकात १५+ अधिक धावा काढणारा भारतीय संघाचा तिसरा फलंदाज ठरला.
हार्दिककडून शिवम, सूर्यकुमार यादवकडून शुभमानला कॅप
नियमित कर्णधार राेहित, माजी कर्णधार विराट काेहलीसारख्या सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत हार्दिकने नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यातून शुभमान गिल आणि शिवम मवीला टी-२० मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. यादरम्यान हार्दिकने शिवम आणि सूर्यकुमार यादवने शुभमानचा कॅप देऊन गाैरव केला.
हार्दिकच्या नेतृत्वात विजयाची १०० टक्के हमी
हार्दिकने गतवर्षी पहिल्यांदाच भारतीय संघाकडून कर्णधाराची भूमिका बजावली हाेती. त्याने आयर्लंड संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व केले. त्यानंतर त्याच्या नेतृत्वात भारताने न्यूझीलंडविरुद्ध मालिकाही खेळली. यातून भारताने त्याच्या नेतृत्वात पाचपैकी ४ सामने जिंकले आहेत.
पाच वर्षांनंतर भारताची नव्या वर्षाची विजयाने झाली सुरुवात; यापूर्वी २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३ गड्यांनी भारताने उघडले हाेते विजयाचे खाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.