आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Sandeep Jadhav Is Constructing The Cricket Groudn At His Own Expense For The Progress Of Cricket In Rural Areas.

मंडे पॉझिटिव्ह:ग्रामीण भागात क्रिकेटच्या प्रगतीसाठी स्वखर्चातून मैदान, प्रशिक्षक संदीप जाधवच्या प्रयत्नांतून साकारणार अत्याधुनिक स्वरूपातील क्रिकेट मैदान; 80 लाखांचा खर्च

स्पाेर्ट्स डेस्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘रणजी’प्रमाणे 50 ते 55 यार्ड सीमारेषा, 6 पिच या, एसी पॅव्हेलियन, व्हिडिओ अॅनालिसिसच्या सुविधा

औरंगाबादग्रामीण भागातील गुणवंत क्रिकेटपटूंनाही आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सामने गाजवण्याची संधी आहे. यासाठी फुलंब्रीमध्ये साडेतीन एकरावर आंतररराष्ट्रीय सुविधा असलेले क्रिकेटचे मैदान उभारले जात आहे. यासाठी महाराष्ट्राचा माजी खेळाडू व प्रशिक्षक संदीप जाधव हे भव्य स्वरूपातील मैदान तयार करतोय. येथील सहा उच्च दर्जाच्या खेळपट्ट्या पिच क्युरेटर संतोष दहिहंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय आपल्या जिद्द व क्रिकेट खेळाच्या वेडापाई स्वखर्चाने या स्टेडियमची उभारणी केली जात आहे. या स्टेडियमसाठी जवळपास ७० ते ८० लाख रुपये खर्च लागेल. ऑक्टोबरमध्ये संपूर्ण मैदान तयार होईल. राज्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे गहुंजे व काही जिल्हा संघटनांकडे क्रिकेट स्टेडियम आहेत. हे सर्व स्टेडियम संस्थांचे अजून शहरी भागात आहे. ग्रामीण खेळाडूंना शहरात क्रिकेटचे महागडे प्रशिक्षण घेणे शक्य होत नव्हते. अशात लहानपानापासून क्रिकेटसाठी पहिले खेळाडू व नंतर प्रशिक्षक म्हणून स्वत:ला वाहून घेतलेल्या संदीपने ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कुटुंंबीयांनी यासाठी पाठबळ दिले.

‘रणजी’प्रमाणे ५० ते ५५ यार्ड सीमारेषा, ६ पिच या, एसी पॅव्हेलियन, व्हिडिओ अॅनालिसिसच्या सुविधा

> स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जांच्या ६ मुख्य खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे स्टम्पमध्ये कॅमेरे लावण्याची सुविधा येथे असेल.

> खेळपट्टीसाठी ३ फूट बेस, सोलिंग, १५० बँग पीसीसी, ४२ हजार विटा लागल्या. येथे रणजी सामन्यासाठी आवश्यक असलेली ५० ते ५५ यार्ड सीमारेषा असणार आहे.

> मैदानाला फेन्सिंग केले, मुख्य कमान, बरमोडा गवत लावण्यात आले. संपूर्ण मैदानात ऑटोमॅटिक पाण्याचे स्प्रिंक्लर, रोलर, कटर, कँटीन, पिण्याचे फिल्टर पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, साऊंड सिस्टिम असतील.

> २ मोठे एसी पॅव्हेलियन, अम्पायर रूम, व्हिडिओ अॅनालिसिस, परिसरात वायफाय, लाइव्ह मॅच स्कोअर, यूट्यूबवर सामने दिसतील.

> एकाच वेळी ४० जणांना येथे राहता येईल. २०० जणांना बसण्याची व्यवस्था आहे. येथे ८ हायमास्टमुळे दिवस-रात्र सामने होतील.

> जिल्हा क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून येथे एमसीएच्या स्पर्धा होऊ शकतील.

गावाचा विकास : ४५ जणांना लाॅकडाऊनमध्ये मिळाला कायम रोजगार

कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प होते. उन्हाळ्यात शेतीची कामे देखील नव्हती. यादरम्यान स्टेडियमच्या कामादरम्यान जवळपास ४० ते ४५ महिला-पुरुषांना सलग चार महिने राेजगार मिळाला. स्टेडियम पूर्ण झाल्यानंतरही येथील १७ ते १८ स्थानिकांना रोजगाराची सोय झाली आहे. त्याचबरोबर गावातील तरुणांना स्टेडियम परिसरात कँटीन, दुकाने, टपरी, भाजीपाला, प्रवासी वाहतूक आदी माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. साहजिकच गावाचा विकास होण्यास मदत मिळेल, असे स्थानिक माजी खेळाडू रवी जाधव यांनी सांगितले. शहरापासून ३० किमी अंतरावर स्टेडियमपर्यंत सिमेंट रस्ता तयार होतोय.