आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेसा एनएक्स चॅप्टरतर्फे आयोजित जेसा क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये यश झांजरी यांच्या संकल्प स्ट्रायकर्स संघाने विजेतेपद पटकावले. बोहरा टायटन्स संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत अपूर्व बोहरा सर्वोत्तम खेळाडू ठरला. नयन कासलीवाल सर्वोत्तम फलंदाज, पीयूष पापडीवाल सर्वोत्तम गोलंदाज आणि गोलंदाज नूपुर बोहराने सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते झाले. जैन इंजिनिअर्स सोसायटी औरंगाबाद (जेसा) चे कार्य कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री भुमरे म्हणाले. विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी संजय पापडीवाल, संजय कासलीवाल, महावीर सेठी, डॉ. सुनील साहुजी, निशिकांत जैन, विजय पापडीवाल, प्रसाद जैन आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सावन चुडीवाल, अपूर्व बोहरा, पीयूष पापडीवाल, दीपेश कांकरिया, संदीप भंडारी, निपुण लोढा, रोनित संचेती आणि साहिल भंडारी यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.