आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शालेय क्रिकेटमधील मित्र सरफराज-अरमानने साेबत गाठला रणजी ट्राॅफी फायनलचा पल्ला

बंगळुरू9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटच्या मैदानावर जमलेली मैत्रीची गट्टी कायम ठेवत सरफराज खान व अरमान जाफरने साेबतच यंदाच्या सत्रात रणजी ट्राॅफीच्या फायनलचा पल्ला गाठला. या दाेघांची यंदाच्या सत्रात ४१ वेळच्या चॅम्पियन मुंबई संघाकडूनची कामगिरी लक्षवेधी ठरली. आपला झंझावात कायम ठेवताना सरफराज हा यंदा स्पर्धेतील टाॅप स्काेअरर फलंदाज ठरला. त्याच्या नावे ८०३ धावांची नाेंद आहे. आता फायनलमध्येही त्याची नजर माेठ्या खेळीवर लागली आहे. तसेच अरमानच्या नावे ३३९ धावा आहेत. आता हे दाेेघेही मुंबई संघाला ४२ व्या ट्राॅफीचा बहुमान मिळवून देण्यासाठी उत्सुक आहेत. येत्या बुधवारी मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात रणजी ट्राॅफीसाठी फायनल हाेणार आहे. मध्य प्रदेशने उपांत्य सामन्यात बंगालचा पराभव करून फायनल गाठली. मध्य प्रदेशने २३ वर्षांनंतर अंतिम फेरीचा पल्ला गाठला.

वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तयार : अरमान जाफर आणि सरफराज खान या दाेघांनी २००८ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता दाेघेही सर्वाेत्तम कामगिरीतून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या दाेघांनाही वडिलांचे खास मार्गदर्शन लाभले. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनातूनच या दाेघांनी क्रिकेटचे धडे गिरवले. अरमानची १४ वर्षांखालील जाइल्स शील्ड ट्राॅफी स्पर्धेतील ४९८ धावांची खेळी लक्षवेधी ठरली हाेती.

सरफराजकडून सचिनचा विक्रम ब्रेक : सरफराज खानचीही झंझावाती फलदंाजी लक्षवेधी ठरणारी आहे. त्याने पदार्पणानंतर आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावत वर्षभरात मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम ब्रेक करण्याचा पराक्रम गाजवला. त्याने हॅरिस शील्ड कपमध्ये ४२१ चेंडूंत ४३९ धावा काढल्या. यासह त्याने सचिनचा ३२९ धावांचा विक्रम मागे टाकला. त्यामुळे सरफराजला झटपट दबदबा निर्माण करता आला.

बातम्या आणखी आहेत...