आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी कसोटी/ दुसरा दिवस:पहिल्या डावात 300+ धावांनी टीम इंडियाचा ‘लाॅर्ड‌्स’चा दावा मजबूत! भारतीय संघाच्या पहिल्या डावात 364 धावा नोंद

लाॅर्ड‌्स4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताच्या सिराजने घेतल्या दोन विकेट; इंग्लंड संघ पिछाडीवर

सलामीवीर लाेकेश राहुलच्या (१२९) शतकापाठाेपाठ अाॅलराउंडर रवींद्र जडेजा (४०), यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (३७) खेळीतून भारताने शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३६४ धावसंख्येची नाेंद केली. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ३ बाद ११९ धावा काढल्या. अद्याप २४५ धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंड संघाचा ज्याे रुट (४८) अाणि जाॅनी बेयरस्ट्राे (६) सध्या मैदानावर कायम अाहेत. भारताकडून सिराजने शानदार दाेन विकेट घेतल्या. सलामीवीर राॅरी बर्न्सचे (४९) अर्धशतक हुकले.

भारतीय संघाने कालच्या ३ बाद २७६ धावांवरून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी खेळण्यास सुुरुवात केली. लाॅर्ड‌्सवर शतक साजरे करणारा लाेकेश राहुलने टीमच्या स्काेअरमध्ये दाेन धावांची भर घालून पॅव्हेलियन गाठले. तसेच अजिंक्य रहाणेला (१) सुमार खेळीचा फटका बसला. जडेजा अाणि ऋषभने ४९ धावांची भागीदारी करून धावसंख्येला गती दिली. यातून भारताने अाता लाॅर्ड‌्सवर ३५०+ धावसंख्या उभी करून विजयाचा दावा मजबूत केला. अातापर्यंत ३००+ धावसंख्येची नाेंद करत भारताने इंग्लंडच्या मैदानावर दाेन वेळा विजयी पताका फडकवली अाहे. त्यामुळे अाता तिसऱ्यांदा बाजी मारण्यास टीम इंडिया सज्ज अाहे.

ऋषभच्या दाैऱ्यात हजार धावा पूर्ण :
भारतीय संघाच्या युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने अाता दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात ३७ धावांची खेळी केली. यासह त्याला विदेशी दाैऱ्यात एक हजार कसाेटी धावा पूर्ण करता अाल्या. त्याच्या विदेशी मैदानावर कसाेटीत १०११ धावा झाल्या अाहेत.

रेड कॅप घालून खेळाडू मैदानावर :
कॅन्सरच्या दुर्धर अाजाराच्या जनजागृतीसाठी भारत अाणि इंग्लंड टीमचे खेळाडू शुक्रवारी दुसऱ्या दिवशी रेड कॅप घालून मैदानावर उतरले. रेड फाॅर रुथ नावाच्या माेहिमेनुसार याचे अायाेजन करण्यात अाले. माजी खेळाडू स्ट्राॅस यांच्या नेतृत्वात ही माेहिम सुरू अाहे.

बातम्या आणखी आहेत...