आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​न्यूझीलंडचा टीम सेफर्ट सामनावीर व मालिकावीर:यजमान न्यूझीलंड संघाचा मालिका विजय; श्रीलंकेचा पराभव

क्वीन्सटाऊन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर व मालिकावीर टीम सेफर्टने (८८) आपल्या झंझावाती खेळीतून यजमान न्यूझीलंड संघाचा घरच्या मैदानावर मालिका विजय साजरा केला. न्यूझीलंड संघाने शनिवारी तिसऱ्या टी-२० सामन्यात पाहुण्या श्रीलंका टीमला धूळ चारली. टाॅम लाॅथमच्या नेतृत्वाखाली यजमान न्यूझीलंड संघाने १९.५ षटकांत ४ गड्यांनी सामना जिंकला. यासह न्यूझीलंड संघाने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या नावे केली. सर्वाेत्तम खेळी करत यजमान संघाच्या विजयात माेलाचे याेगदान देणारा सेफर्ट सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

दासून शनाकाच्या नेतृत्वात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंंका संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १८२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने सहा गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयासाठी सेफर्टची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. याशिवाय गाेलंदाजीमध्ये न्यूझीलंडच्या बेन लिस्टरची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्याने दाेन बळी घेतले. तसेच अॅडम मिल्ने आणि ईश साेढीने प्रत्येकी १ बळी घेतला.