आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:शाहरुखची भारत, विंडीजसह आता अमेरिकेतही क्रिकेट टीम, मेजर लीगसाठी खरेदी केला संघ

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टी-20 मध्ये लाॅस एंजलिस नाइट रायडर्सचा मालक

बाॅलीवूडचा सिनेअभिनेता शाहरुख खानने अमेरिकेतही क्रिकेटला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला. यातूनच या ठिकाणी आता किंग खानच्या मालकीचा संघ टी-२० लीगमध्ये खेळणार आहे. त्याने नुकताच येथील मेजर लीगसाठी आपला एक संघ खरेदी केला आहे. त्यामुळे अमेरिकेतील टी-२० लीगमध्ये किंग खानचा लाॅस एंजलिस नाइट रायडर्स संघ खेळणार आहे. अशा प्रकारे आता त्याचा प्राेफेशनल लीगमध्ये सहभागी हाेणारा तिसरा संघ ठरला. यामध्ये आयपीएलमध्ये सहभागी हाेणाऱ्या काेलकाता नाइट रायडर्स आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिनबागाे नाइट रायडर्सचा समावेश आहे. त्यामुळे आता त्याचा तिसरा संघ अमेरिकेतील लीगमध्ये आपले नशीब आजमावणार आहे. आयपीएलमधील काेलकाता नाइट रायडर्स संघाची कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे.

अमेरिकेमध्ये २०२० मध्ये मल्टी-मिलियन डाॅलर टी-२० लीग हाेणार आहे. याच लीगसाठी नुकतीच संघाची घाेषणा करण्यात आली. अमेरिका क्रिकेट एंटरप्रायझेसने (एसीआय) यादरम्यान शाहरुखच्या नव्या टीम खरेदीच्या वृत्ताला दुजाेरा दिला. अमेरिकेतील लीगमध्ये जवळपास सर्व संघ सहभागी हाेणार आहेत. यामध्ये न्यूयाॅर्क, सॅन फ्रान्सिस्काे, वाॅशिंग्टन डीसी, शिकागाे, डलास आणि लाॅस एंजलिसचा समावेश आहे.

‘लाॅस एंजलिस नाइट रायडर्स संघ आता आमच्या लीगमध्ये सहभागी हाेणार आहे. यासाठी शाहरुख खानने पुढाकार घेतला. त्यामुळे आमच्या लीगमध्ये अजूनही एक संघ सहभागी झाला. यातून येथ‌े क्रिकेटला चालना मिळण्यासाठी मदत हाेईल, अशी प्रतिक्रिया एसीआयचे विजय श्रीनिवासन यांनी दिली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser