आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तान क्रिकेट टीममध्ये सध्या लग्नाचा सीजन सुरु आहे. पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शाहीन शाह आफ्रिदी देखील लग्नबंधनात अडकला आहे. शाहीनने आज पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न केले आहे. शाहीन आणि अंशा यांनी आज निकाह नाम्यावर स्वाक्षरी केली. निकाह पार पडला असला तरी शाहीनला आपल्या पत्नीपासून लांब रहाव लागणार आहे. कारण, शाहिद आज मुलीची पाठवणी करणार नाही. संपूर्ण पाकिस्तान संघाव्यतिरिक्त अनेक बड्या व्यक्ती या लग्नाला उपस्थित राहिल्या.
शाहीन आफ्रिदी आणि अक्साचे लग्न दोन वर्षांपूर्वी निश्चित झाले होते. शाहीन आणि अंशा यांच्या अफेयरची चर्चा माध्यमांमध्ये आल्यानंतर शाहिद आफ्रिदीने यावर भाष्य केले होते. त्याने म्हटले होते की, शाहीनच्या कुटुंबाने माझ्या मुलीसाठी माझ्या कुटुंबाशी संपर्क साधला. दोन्ही कुटुंबे संपर्कात आहेत. लग्नच्या गाठी या स्वर्गात जोडल्या जातात. जर अल्लाहची इच्छा असेल, तर ही जोडीही तयार होईल. शाहीनला मैदानावर आणि मैदानाबाहेर यश मिळावे यासाठी माझ्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत. यानंतर शाहीन आफ्रिदीनेही शाहिदचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली.
पीएसएलमधून मैदानात पुनरागमन
6 फूट 6 इंच उंचीच्या शाहिन आफ्रिदीची वधू बनलेल्या अंशाचे क्रिकेटवर खूप प्रेम आहे. अनेकदा ती वडिलांसोबत स्टेडियममध्ये मॅच पाहताना दिसते. शाहिनने 2018 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात झाली. आपल्या वेग आणि स्विंगच्या जोरावर शाहिन अल्पावधीतच पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज बनला. शाहिन गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. 13 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधून तो मैदानावर पुनरागमन करत आहे.
जानेवारीत 4 क्रिकेटपटूंचे लग्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू शादाब खान आणि शान मसूद यांनी जानेवारीमध्ये लग्न केले होते. त्याचवेळी भारतीय संघाचे खेळाडू केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनीही याच महिन्यात विवाह केला. वेगवान गोलंदाज हरिस रौफने गतवर्षी डिसेंबरमध्ये लग्न केले होते.
मुलीच्या लग्नामुळे शाहिद आफ्रिदी पुन्हा चर्चेत
मुलीच्या लग्नामुळे शाहिद आफ्रिदी पुन्हा चर्चेत आला आहे. क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आणि पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज शाहिद आफ्रिदी हा आपल्या मैदानावरील प्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत राहिला होता. एक सेलिब्रिटी असतानाही शाहिद आफ्रिदीने मामाच्याच मुलीशी लग्न केले होते. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.