आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी उद्या निकाह करणार आहे. त्याचा पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची कन्या अंशासोबत 3 फेब्रुवारीला विवाह होणार आहे. निकाहसाठी हा वेगवान गोलंदाज कुटुंबासह कराचीला पोहोचला आहे. येथे या निकाहची जोरदार तयारी सुरू आहे.
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, शाहिन आपल्या कुटुंबासह कराचीमध्ये आहे. 3 फेब्रुवारीला होणाऱ्या विवाह सोहळ्याच्या तयारीत सगळेच व्यग्र झाले आहेत. बाबर आझमसह संपूर्ण पाकिस्तान संघाव्यतिरिक्त अनेक बड्या व्यक्ती या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शाहिनने जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती, जी आता पूर्ण होत आहे. अंशाशी लग्न करण्यासाठी शाहिनला बराच काळ वाट पाहावी लागली. वास्तविक, दोन वर्षांपूर्वी या नात्याबद्दल दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी शाहिनच्या वडिलांनी सांगितले होते की, अंशा अजूनही शिकत आहे. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाहिनशी निकाह होईल.
पीएसएलमधून मैदानात पुनरागमन
6 फूट 6 इंच उंचीच्या शाहिन आफ्रिदीची वधू बनलेल्या अंशाचे क्रिकेटवर खूप प्रेम आहे. अनेकदा ती वडिलांसोबत स्टेडियममध्ये मॅच पाहताना दिसते. शाहिनने 2018 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात झाली. आपल्या वेग आणि स्विंगच्या जोरावर शाहिन अल्पावधीतच पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज बनला. शाहिन गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. 13 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधून तो मैदानावर पुनरागमन करत आहे.
जानेवारीत 4 क्रिकेटपटूंचे लग्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू शादाब खान आणि शान मसूद यांनी जानेवारीमध्ये लग्न केले होते. त्याचवेळी भारतीय संघाचे खेळाडू केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनीही याच महिन्यात विवाह केला. वेगवान गोलंदाज हरिस रौफने गतवर्षी डिसेंबरमध्ये लग्न केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.