आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Shahid Afridi Coronavirus Updates | Pakistan Former Captain Shahid Afridi Tested Positive For Coronavirus Covid 19 News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान क्रिकेट:माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण, म्हणाला - लवकर बरे होण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रीडा विश्वातील 7 दिग्गजांचा कोरोनामुळे मृत्यू

पाकिस्तान क्रिकेट संघाजा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. आफ्रिदीने शनिवारी ही माहिती दिली. याआधी त्याने ट्वीटमध्ये म्हटले की, मी गुरुवारपासून आजारी आहे. शरीरात खूप वेदना होत आहेत. मी टेस्ट केली असता दुर्दैवाने कोरोना पॉझिटिव्ह आली. लवकर बरे होण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. 

आफ्रीदीने 27 कसोटीत 1716 आणि 398 एकदिवसीय सामन्यांत 8064 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 99 टी-20 सामन्यांत 1416 धावा आहेत. आयपीएलमध्ये आफ्रिदीने केवळ 10 सामने खेळले, ज्यात त्याने 81 धावा केल्या. 

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू तौफीक उमर देखील संक्रमित 

माजी पाकिस्तानी क्रिकेटर तौफीक उमर यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांना स्वतःला क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. याशिवाय क्रिकेट जगतातील स्कॉटलंडचे माजित हक आणि दक्षिण आफ्रिकाचे सोलो अॅनक्वेनी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तौफीकने 44 कसोटीत 2963 आणि 12 वनडेमध्ये 504 धावा केल्या आहेत. 

कोरोनाने पाकिस्तानमध्ये दोन माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंचा मृत्यू 

पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत दोन माजील प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रईज शेख (51) आणि जफर सरफराज (50) यांचा मृत्यू झाला. याशिवाय पाकिस्तानी मूळचा स्क्वॅश दिग्गज आझम खान (95) यांचाही बळी गेला आहे. आजम यांच्या मृत्यू इंग्लंडमध्ये झाला होता. 

क्रीडा विश्वातील 7 दिग्गजांचा कोरोनामुळे मृत्यू 

कोरोनामुळे जपानचे सुमो पहलवान शोबुशी (28), इंग्लंडचे माजी फुटबॉलर नॉर्मन हंटर (76), धावपटू दोनातो साबिया (56), स्वित्झर्लंडचे आइस हॉकीपटून रोजर शॅपो (79), फ्रान्सचे फुटबॉल क्लब रीम्सचे डॉक्टर बर्नार्ड गोंजालेज (60), इंग्लंडचे लंकाशायर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष डेविड हॉजकिस (71) आणि फ्रान्सचे ऑलिम्पिक डी मार्शल फुटबॉल क्लबचे माजी अध्यक्ष पेप दिऑफ (68) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...