आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराT-20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडल्यानंतर IPL च्या भूमिकेवरही सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कर्णधारपदवरून शाहिद आफ्रिदीने टीम इंडियाच्या नेतृत्वावर जहरी टीका केली आहे.
ICC T-20 विश्वचषक 2022 मध्ये, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचला होता आणि तिथे तो इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत होऊन या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. खेळात जिंकणे आणि हरणे अपरिहार्य असते, पण ज्या प्रकारे टीम इंडियाचा पराभव झाला, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
केवळ भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे की सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर भारताला कर्णधार मिळालेला नाही जो टीम इंडियासाठी आघाडीचे नेतृत्व करू शकेल
भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर आफ्रिदी एका वृत्तवाहिनीवर म्हणाला, 'आता अशा गोष्टीवर लक्ष दिले जाईल, जर तुम्ही जिंकलात तर या सर्व गोष्टी विसरल्या जातात. टीम इंडियाचा पराभव झाला आणि या पराभवावर प्रत्येकजन प्रतिक्रिया देत आहे.
पण जर गांभीर्याने विचार केल्यास टीम इंडियाला गांगुली आणि धोनीनंतर एका चांगल्या कर्णधाराची गरज दिसून येत आहे. जो स्वता: समोरून टीमचे नेतृत्व करेल. धोनीनंतर विराट कोहली आणि नंतर रोहित शर्मावर यांना संधी देण्यात आली.
पण दोघांनीही काही विशेष परिणाम दिले नाही. आता रोहित कर्णधार आहे, पण टीम इंडियाची कामगिरी काही विशेष दिसत नाही..
तो पुढे म्हणाला, 'टीममध्ये चांगल्या नेतृत्वाची भूमिका खूप महत्त्वाची असते, त्याची कामगिरी खूप महत्त्वाची ठरते. IPL दोन महिन्यांहून अधिक काळ खेळला जातो. त्यात अनेक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते, पण तरीही टीम इंडियाला चांगला संघ तयार करता आलेला नाही.
मला असे वाटते की त्यांनी आता यावर काम करणे आवश्यक आहे. चूक कुठे होत आहे याचा विचार BCCI ला करावा लागेल. कारण त्यांनी क्रिकेटवर खूप पैसा गुंतवला आहे आणि अनेक चांगले खेळाडूही पुढे आले आहेत.
पण तुम्ही अशा मोठ्या स्पर्धा जिंकल्या नाहीत तो चिंतेचा विषय आहे आणि यावर खरंच विचार करण्याची गरज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.