आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Shahid Afridi: India Vs Pakistan Cricket Series 2021 Update | Shahid Afridi On Bilateral Cricket Relations

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट:दोन्ही देशांतील संबंध दृढ करण्यासाठी ही मालिका खेळणे आवश्यक - शाहिद आफ्रिदी; खेळाला राजकारणांपासून दूर ठेवायला हवे

कराची23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयसीसीच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता

भारत आण‍ि पाकिस्तान हे दोन्ही संघ गेल्या आठवर्षापासून ऐकमेकांच्या विरोधात क्रिकेट मालिका खेळलेले नाही. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका खेळवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध मजबूत होण्यास मदत मिळणार असल्याचे ही त्यांनी यावेळी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले की, जगात सर्वच खेळांमध्ये राजकारणाने हस्तक्षेप सुरू केला असून आता क्रिकेटला यापासून दूर ठेवायला हवे. यापूर्वी पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी देखील ही मालिका गरजेची असल्याचे म्हटले होते.

माध्यम वृत्तानुसार, दोन्ही संघामध्ये तीन सामन्याचे टी-20 मालिका होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर दोन्ही संघ आठ वर्षानंतर पुन्हा एखदा ऐकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघामध्ये 2012 मध्ये टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. त्यामध्ये टी-20 मालिका 1-1 बरोबरीत राहत एकदिवसीय मालिका पाकिस्तान संघाने 2-1 जिंकली होती.

दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी खेळ हा सर्वोत्तम मार्ग - शाहिद आफ्रिदी
माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगितले की, दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्यासाठी खेळ हा सर्वोत्तम मार्ग असून त्याला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आल्यावर मोठ्या प्रमाणावर खूश पहायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले. जर दोन्ही देशांतील संबंध अधिकाधिक दृढ करायचे असेल तर क्रिकेट हाच एकमेव मार्ग आहे.

आयसीसीच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता
पुढच्या आठवड्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीमध्ये यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आतापर्यंत या प्रकरणावर कोणाताही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे 30 मार्च रोजी दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा होऊ शकते. दरम्यान या विषयावर तोडगा काढत संमती दर्शवली जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...