आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या लग्नामुळे शाहिद आफ्रिदी पुन्हा चर्चेत:हजारो पोरी होत्या फिदा, पण शेवटी मामाच्या पोरीशीच केले होते लग्न

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा ही पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शाहीन शाह आफ्रिदीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. मुलीच्या लग्नामुळे शाहिद आफ्रिदी पुन्हा चर्चेत आला आहे. क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आणि पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज शाहिद आफ्रिदी हा आपल्या मैदानावरील प्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत राहिला होता. एक सेलिब्रिटी असतानाही शाहिद आफ्रिदीने मामाच्याच मुलीशी लग्न केले होते.

पाकिस्‍तानमध्‍ये आफ्रिदीला जितकी लोकप्रियता मिळालेली आहे. कदाचित दुस-याला खचितच मिळाली असेल. एक काळ असा होता की केवळ पाकिस्तानीच नव्हे, तर भारतासह अनेक देशांच्या तरुणी आफ्रिदीवर फिदा होत्या. अनेकींच्या कल्पनेतील तो राजकुमार होता. हजारो लाखो फीमेल फॉलोअर्स असतानाही पाकिस्तानच्या सर्वात लोकप्रिय फलंदाजाचा विवाह त्याच्या मामाच्या मुलीशी झाला आहे.

शाहिद आफ्रिदीचे कुटुंब. सेलिब्रिटी असूनही आफ्रिदीची फॅमिली कधीच लाईमलाईटमध्ये आली नाही.
शाहिद आफ्रिदीचे कुटुंब. सेलिब्रिटी असूनही आफ्रिदीची फॅमिली कधीच लाईमलाईटमध्ये आली नाही.

पहिले प्रेम...
एकदा शाहिद आफ्रिदीने स्वतःच खुलासा केला होता की, तो शाळेत शिकत असतानाच प्रेमात पडला होता.
तो जिच्या प्रेमात पडला ती कुणी दुसरी-तिसरी नसून खुद्द त्यला शिकवणारीच एक शिक्षिका होती.
त्याने गमतीने असेही सांगितले होते की, तेव्हा मी केवळ 9 वर्षांचा होतो.
मी शिक्षिकेच्या प्रेमात पडलो होतो. ती फार सुंदर होती.

एक काळ असा होता की केवळ पाकिस्तानीच नव्हे, तर भारतासह अनेक देशांच्या तरुणी आफ्रिदीवर फिदा होत्या. अनेकींच्या कल्पनेतील तो राजकुमार होता
एक काळ असा होता की केवळ पाकिस्तानीच नव्हे, तर भारतासह अनेक देशांच्या तरुणी आफ्रिदीवर फिदा होत्या. अनेकींच्या कल्पनेतील तो राजकुमार होता

मामाच्या मुलीशी लग्न
शाहिद आफ्रिदी वैयक्तिक जीवनाबद्दल कधीच माध्यमांसमोर बोलत नाही. मात्र जेव्हा-जेव्हा त्याला त्याच्या पत्नी विषयी विचारले जाते, तो दिलखुलासपणे उत्तरे देताना दिसून आला आहे.
लग्नासंदर्भात विचारले असता त्याने सांगितले होते की, एका दौर्‍यावर जाण्याआधी मी माझ्या वडिलांना सहज मजेत मला लग्नासाठी मुलगी बघा असे म्हटले. मात्र, माझे बोलणे त्यांनी जरा जास्तच सिरिअस घेतले.
जेव्हा मी परदेशातून पतरलो तेव्हा, ते मला घराच्या गच्चीवर घेऊन गेले आणि म्हणाले की, मी तुझा साखरपुडा उरकला आहे.
हे ऐकूण मला धक्काच बसला. आश्चर्याची गोष्ट तर ही की, शाहिदची होणारी पत्नी दुसरी- तिसरी कुणी नसून त्याच्याच मामाची मुलगी नादिया होती.
शाहिद आणि नादियाला अक्सा, अज्वा, अस्मरा आणि अनस्पा अशा चार मुली आहेत.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी निकाह करणार आहे. त्याचा पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची कन्या अंशासोबत 3 फेब्रुवारीला विवाह होणार आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी निकाह करणार आहे. त्याचा पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची कन्या अंशासोबत 3 फेब्रुवारीला विवाह होणार आहे.

लग्नानंतर पहिल्या सामन्यात चमकला
शाहिद आफ्रिदी आणि नादिया यांचा विवाह 22 ऑक्टोबर, 2000 रोजी झाला.
इंग्लंडविरुद्ध सीरीज सुरू होती. शाहिद लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी टीमसोबत गेला होता.
लग्नानंतर लाहोरमध्ये झालेल्या या पहिल्याच सामन्यात आफ्रिदीने खळबळ उडवून दिली.
त्याने या सामन्यात हाफसेंच्युरी करत तब्बल 5 विकेट्स घेल्या.
त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले तत्कालीन
राष्ट्रपति मुशर्रफ यांनीही त्याचे कौतुक केले होते.

शाहिन आफ्रिदी होणार शाहिद आफ्रिदीचा जावई

अंशा आफ्रिदी ही पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची कन्या आहे.
अंशा आफ्रिदी ही पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची कन्या आहे.

शाहिनने जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती, जी आता पूर्ण होत आहे. अंशाशी लग्न करण्यासाठी शाहिनला बराच काळ वाट पाहावी लागली. वास्तविक, दोन वर्षांपूर्वी या नात्याबद्दल दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी शाहिनच्या वडिलांनी सांगितले होते की, अंशा अजूनही शिकत आहे. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाहिनशी निकाह होईल. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...