आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाकिब अल हसन जमावावर भडकला:कार्यक्रमादरम्यान सुरक्षारक्षकाच्या उपस्थितीत चाहत्याला केली मारहाण

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शकिब अल हसन पुन्हा एकदा वादात सापडला आहे. कडेकोट बंदोबस्तात शेकडो लोकांनी वेढलेले असतानाही, बांगलादेशातील चितगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान शकीब अल हसनने त्याच्या टोपीने एका चाहत्याला मारहाण केली.

बांगलादेशातील मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाकिब कारमध्ये बसण्यासाठी जात होता, त्याचवेळी एका चाहत्याने त्याची कॅप हिसकावण्याचा प्रयत्न केला. शाकिबला राग आला आणि त्याने त्याच्या टोपीचा वापर करून फॅनला मारहाण केली.

ढाका प्रीमियर लीगमध्ये उखडले होते स्टंप्स ​​​

शाकिब अल हसन यापूर्वीही वादात सापडला आहे. जून 2021 मध्ये झालेल्या ढाका प्रीमियर लीगमध्ये शाकिबने सामन्यादरम्यान अंपायरकडे दाद मागितली होती. जेव्हा अंपायरने फलंदाजाला बाद घोषित केले नाही तेव्हा शाकिबने रागाने स्टंपला लाथ मारली. नंतर शाकिबने बराच वेळ वाद घातला आणि स्टंप्स उखडून फेकले होते.

शाकिबच्या या कृतीवर पंचांनी सामना स्थगित केला होता
शाकिबच्या या कृतीवर पंचांनी सामना स्थगित केला होता

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत शाकिब आहे कर्णधार

शाकिब सध्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत बांगलादेश संघाचे नेतृत्व करत आहे. 9 मार्च रोजी झालेल्या पहिल्या T20 सामन्यात बांगलादेशने T20 आणि ODI विश्वविजेत्या इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात शाकिबने 24 चेंडूत 34 धावा केल्या. शाकिब आणि अफिफने 34 चेंडूत 46 धावांची नाबाद भागीदारी करत आपल्या संघाला 12 चेंडू राखून विजय मिळवून दिला.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन टी-20 मालिकेच्या ट्रॉफीसह.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन टी-20 मालिकेच्या ट्रॉफीसह.

शाकिबवर यापूर्वी घालण्यात आली होती बंदी

शाकिबवर 2019 मध्ये 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. वास्तविक, 2019 मध्ये, बुकीने त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने तक्रार केली नाही, ज्यामुळे ICC ने त्याच्यावर ही बंदी घातली. श्रीलंका, बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्या मालिकेदरम्यान ही घटना घडली होती. मात्र, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बंदी संपल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला.

बातम्या आणखी आहेत...